ETV Bharat / city

सीबीआयला मिळणार वाझेंची 'ती' डायरी, कोर्टाने दिली परवानगी - antilia case

या डायरीत मुंबईतील हॉटेल्स, बार आणि पब्जच्या नोंदी असून सदर वसुलीची माहिती यात असल्याचा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे.

सीबीआयला मिळणार वाझेंची 'ती' डायरी, कोर्टाने दिली परवानगी

author img

By

Published : Apr 10, 2021, 8:55 AM IST

मुंबई : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि विनायक शिंदेची डायरी तपासू देण्याची मागणी सीबीआयने केल्यानंतर विशेष एनआयए कोर्टाने याला मंजुरी दिली आहे. या डायरीत मुंबईतील हॉटेल्स, बार आणि पब्जच्या नोंदी असून सदर वसुलीची माहिती यात असल्याचा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे. याच आधारावर मुंबईतील न्यायालयाने तपास यंत्रणांची मागणी मान्य केली. तसेच एनआयएने सीबीआयला तपासात आवश्यक असे लागणारे पुरावे देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

वाझेंना 23 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाकडून सचिन वाझेंची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सचिन वाझेंला 23 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे निर्देश विशेष एनआयए कोर्टाने दिले आहेत. सचिन वाझेंच्या कोठडीची मागणी एनआयएने केली होती, मात्र कोर्टाने ती फेटाळली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात सचिन वाझेंचा वैद्यकीय अहवाल सादर करण्यात आला. वाझेंची प्रकृती ठणठणीत असून त्यांना कुठल्याही उपचारांची गरज नाही, अशी माहिती एनआयएने कोर्टात दिली.

एनआयएकडील पुरावे सीबीआयला मिळणार

एनआयएच्या ताब्यात असलेली कागदपत्रे सीबीआयला दाखवण्यास विशेष एनआयए कोर्टाची परवानगी मिळाली आहे. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर कलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करत आहे. सचिन वाझेंची डायरी आणि इतर जे काही जमा केलेले पुरावे आहेत ते सीबीआयला आता मिळणार आहेत.

वाझेंचं पत्र लीक झाल्यावर एनआयएचा आक्षेप

दरम्यान, वाझेंचं पत्रं मीडियात लीक झाल्याबद्दल एनआयएने जोरदार आक्षेप घेतला. वाझे कस्टडीत असताना त्यांचं पत्रं लीक झालंच कसं? असा सवाल एनआयएने केला. त्याबाबत कोर्टाने वाझेंच्या वकिलांना विचारणा केली असता मला यातलं काहीच माहीत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. लेटर कसं बाहेर आलं हे मला माहीत नाही. या प्रकरणात मी सहभागी नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तर असा प्रकार पुन्हा घडता कामा नये, अशी सक्त ताकीद न्यायाधीशांनी दिली. वाझेंच्या आरोग्याविषयीची माहितीही कोर्टाकडून विचारली गेली. त्यावर वाझे फिट आहेत. त्यांना सध्या उपचाराची गरज नाही, असं एनआयएकडून सांगण्यात आलं.

हिरेनचाही कटात सहभाग!
मागील सुनावणीत मनसूख हिरेन हा मुकेश अंबानी यांच्या अँटालिया बाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या कटात सामील होता. त्यातूनचं त्याचा जीव गेला, असा दावा एनआयएचा वकिलांनी कोर्टात केला होता. सचिन वाझे यांच्याकडून 36 लाख रूपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. हा पैसा कुठून आला, तो कशासाठी वापरायचा होता याची चौकशी होणं आवश्यक आहे असे सांगत 'शेवटी यामागे काहीतरी मोठा आर्थिक हेतू हेता हे स्पष्ट आहे', मग तो काय होता?, याचीही चौकशी होणं आवश्यक असा युक्तिवाद एनआयएकडून कोर्टात केला गेला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.