मुंबई - सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सीबीआयचे पथक मुंबईत येऊन तपास करीत आहे. मुंबईतील सांताक्रुझ परिसरातील डीआरडीओ येथील गेस्टहाऊसवर सीबीआयचे पथक थांबलेले आहे. याच ठिकाणाहून सुशांत प्रकरणी वेगवेगळ्या व्यक्तींची चौकशी केली जात आहे. आज सकाळी मुंबई पोलिसांच्या वांद्रे पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलावण्यात आले. या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी सुशांतने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या घरी जाऊन घटनास्थळाचा आढावा घेऊन पंचनामा केला होता.
सुशांतसिंह प्रकरणी आतापर्यंत 5 हुन अधिक जणांची सीबीआयकडून चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये सुशांतसिंहचा मित्र सिद्धार्थ पीठाणी, स्वयंपाकी नीरज, हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा व त्याबरोबरच हाउसकीपिंगचा कर्मचारी दीपेश सावंत यांचा समावेश आहे. सुशांतसिंह ज्या वांद्रे स्थित घरात राहत होता, त्या घराचा मालक संजय लालवाणी याचीसुद्धा सीबीआयने चौकशी केली आहे. पुढे जाऊन रिया चक्रवती व तिच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी समन्स सीबीआय बजावणार आहे. याचाच डीआरडीओ कार्यालयाजवळून आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी आढावा घेतलाय...