ETV Bharat / city

सुशांतसिंह मृत्यू प्रकरण: रिया चक्रवर्तीची सलग तिसऱ्या दिवशी ९ तास चौकशी - सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सीबीआय चौकशी

सुशांतसिंहची मैत्रिण रिया चक्रवर्तीची आज तिसऱ्या दिवशीही सीबीआय चौकशी करण्यात आली. मागील दोन दिवसांसह आजच्या चौकशीनंतर रियाची तब्बल २६ तासाची चौकशी करण्यात आली आहे.

सुशांतसिंह मृत्यू प्रकरण: रिया चक्रवर्तीची सलग तिसऱ्या दिवशी ९ तास चौकशी

author img

By

Published : Aug 30, 2020, 3:34 PM IST

Updated : Aug 30, 2020, 8:34 PM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू आहे. शुक्रवार आणि शनिवारी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची सुमारे १७ तास चौकशी करण्यात आली. यानंतर आज रविवारी रिया चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, सिद्धार्थ पिठाणी हे तिघेही सीबीआयसमोर हजर झाले. दरम्यान, ९ तासांच्या चौकशीनंतर रिया डीआरडीओच्या अतिथी गृहातून बाहेर पडली आहे.

रिया डीआरडीओच्या अतिथी गृहातून बाहेर पडताना

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह याचा 14 जूनला मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एडीआर रिपोर्ट दाखल केला होता. मात्र, याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला नव्हता. याच दरम्यान सुशांतसिंहच्या वडिलांनी बिहारमध्ये एफआयआर दाखल केला. प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी जोर धरू लागली असताना सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला आहे.

सुशांतसिंह प्रकरणी सीबीआय गेले दहा दिवस मुंबईत चौकशी करत आहे. सुशांतसिंह याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिची गेले दोन दिवस 17 तास चौकशी करण्यात आली आहे. आज तिसऱ्या दिवशी पुन्हा रिया सांताक्रूझ येथील डीआरडीओच्या अतिथी गृहात चौकशीसाठी 10.32 वाजता हजर झाली. तिच्या आधी सॅम्युअल मिरांडा चौकशीसाठी हजर झाला होते. तसेच सुशांतच्या सोबत घरात राहणार त्याचा मित्र सिद्धार्थ पिठानी हा सुद्धा सीबीआय अधिकाऱ्यांपुढे चौकशीसाठी हजर झाला. यानंतर रियाची तब्बल ९ तास चौकशी करण्यात आली. नीरजसिंह यांची सीबीआयने चौकशी केली आहे. मागील दोन दिवसांसह आजच्या चौकशीनंतर रियाची तब्बल २६ तास चौकशी करण्यात आली आहे. यानंतर रिया डीआरडीओच्या अतिथी गृहातून बाहेर पडली आहे.

या प्रकरणात अमली पदार्थाची माहिती समोर आल्याने एक नवीन वळण मिळाले आहे. दरम्यान, रियाने मीडिया आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार केल्यावर तिला सीबीआय चौकशीसाठी जाण्यास आणि पुन्हा घरी येताना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.

हेही वाचा - सुशांतसिंह राजपूत प्रकरणी 'ईडी' करणार गौरव आर्याची चौकशी

Last Updated : Aug 30, 2020, 8:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.