ETV Bharat / city

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या विरोधात सीबीआयकडून तीन गुन्हे दाखल, 16 ठिकाणी छापेमारी - नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमधील सर्व्हर घोटाळा

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमधील सर्व्हर ( Servers on the National Stock Exchange ) घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी केली गेली. यानंतर आता 2009 ते 2017 या काळात NSE कर्मचार्‍यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याप्रकरणी सीबीआयने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. देशभरात अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे. एमएचएच्या आदेशानंतर सीबीआयने एनएसई घोटाळ्यात बेकायदेशीर फोन टॅपिंगचा गुन्हा दाखल केला आहे.

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे
author img

By

Published : Jul 8, 2022, 12:44 PM IST

Updated : Jul 8, 2022, 1:34 PM IST

मुंबई- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही आहे. संजय पांडे निवृत्त होताच त्यांना ईडी कडून समन्स बजावण्यात आला होता. त्यानंतर आज सीबीआयने त्यांच्या विरोधात तीन गुन्हे दाखल केले आहे. तसेच पांडे यांच्या संबंधित मुंबई, चंदीगड, चेन्नई या 16 ठिकाणी सीबीआयकडून छापेमारी देखील करण्यात येत आहे. मुंबई पोलीस आयुक्त पदी असताना पांडे यांनी भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांना विरोधात गुन्हे दाखल करत कारवाई केली होती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे असलेले अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमधील सर्व्हर घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी केली गेली. यानंतर आता 2009 ते 2017 या काळात NSE कर्मचार्‍यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याप्रकरणी सीबीआयने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. देशभरात अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे. एमएचएच्या आदेशानंतर सीबीआयने एनएसई घोटाळ्यात बेकायदेशीर फोन टॅपिंगचा गुन्हा दाखल केला आहे.

आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप-एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण ( NSE Ex CEO chitra ramkrishna ) आणि माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यन यांच्यासह अन्य आरोपींशी संगनमत करून शेअर बाजाराच्या यादीत असलेल्या काही कंपन्यांना फायदा करुन देऊन आर्थिक गैरव्यवहार केला. एनएसई सर्व्हरच्या माध्यमातून करण्यात आलेल्या को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने 2018 मध्ये गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. सीबीआयने गेल्या चार वर्षांत केलेल्या तपासाच्या आधारे चित्रा रामकृष्ण, आनंद सुब्रमण्यन यांना अटक केली आहे.

या ठिकाणी छापे-मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना आरोपी ठरवण्यात आलं आहे. याप्रकरणी देशभरात सीबीआयने छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतही 9 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. NSE घोटाळ्यातील आरोपी चित्रा हिने संजय पांडे यांना NSE मधील लोकांचे फोन टॅप करण्यास सांगितले होते. सीबीआयने याप्रकरणी 16 ठिकाणी छापे टाकले आहेत. यात मुंबईत 8, पुण्यात 2, चंदीगड 1, लखनऊ आणि कोटा येथे प्रत्येकी एक, तर दिल्ली एनसीआरमध्ये 5 छापे टाकण्यात आले आहेत.

नवीन गुन्हा दाखल- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे 30 जूनला सेवा निवृत्त झाले. त्यांच्याजागी विवेक फणसाळकर यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. सेवानिवृत्ती होऊन चार दिवस उलटत नाहीत तोवर त्यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने समन्स बजावले. यानंतर सीबीआयने एनएसईच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण, रवी नारायण आणि मुंबईचे माजी आयुक्त संजय पांडे यांच्याविरुद्ध एनएसई अधिकाऱ्यांचे फोन टॅप करणे आणि इतर अनियमितता केल्याप्रकरणी नवीन गुन्हा दाखल केला आहे.

महाविकास आघाडी सरकारचे एजंट असल्याची टीका- गेली चार महिन्यांपासून मुंबईचे माजी आयुक्त संजय पांडेची कारकिर्द बरीचशी वादग्रस्त ठरली आहे. संजय पांडे हे शिवसेनेचे निकटवर्तीय मानले जातात. ते पोलिस आयुक्तपदी असताना शिवसेनेविरोधात आवाज उठवल्याबद्दल भाजप नेते किरीट सोमय्या, मोहित कंबोज, नारायण राणे आणि अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तर संजय पांडे यांच्यावर ते महाविकास आघाडी सरकारचे एजंट असल्याची टीकाही केली होती.

हेही वाचा-Sanjay Pandey On Unauthorized Peddlers : मुंबई पोलीस आयुक्तांच्या रडारवर अनधिकृत फेरीवाले, लवकरच कारवाई करण्याचे संकेत

हेही वाचा-मुंंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची दिल्लीतील ईडी कार्यालयात चौकशी

हेही वाचा- CBI issues look-out Notice : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या विरोधात सीबीआयकडून लूक आऊट नोटीस

Last Updated : Jul 8, 2022, 1:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.