मुंबई - सीबीआय प्रमुख सुबोध जयस्वाल यांनी फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने पाठवलेल्या प्रश्नावलीला प्रतिसाद दिला आहे. सायबर विभागाने सुबोध जयस्वाल यांना समन्स बजावून १४ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु सुबोध जयस्वाल चौकशीसाठी हजर राहिले नव्हते, यानंतर जयस्वाल यांना सायबर विभागाकडून प्रश्नावली पाठवली गेली होती. त्या प्रश्नानांनी शुक्रवारी जयस्वालांनी उत्तर दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
राज्यातील फोन टॅपिंग प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) प्रमुख सुबोध जयस्वाल यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून फोन टॅपिंग प्रकरणात समन्स पाठवण्यात आले होते. जयस्वाल यांना १४ ऑक्टोबर रोजी मुंबई सायबर गुन्हे शाखेत उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. जयस्वाल यांच्याकडील फोन टॅपिंग प्रकरणातील माहिती घेण्यासाठी सायबर विभागाने समन्स बजावले होते. मिळालेल्या माहितीनुसार सुबोध जयस्वाल यांना पहिले प्रश्नावली पाठवण्यात आली होती. परंतु त्या प्रश्नावलीला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स जारी केले होते. मात्र जयस्वाल चौकशीसाठी हजर राहिले नाही. यामुळे त्यांना सायबर विभागाकडून प्रश्नावली पाठवण्यात आली होती. या प्रश्नावलीला सुबोध जयस्वाल यांनी प्रतिसाद दिला आहे.
हेही वाचा : कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने बजावले परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला यांना समन्स
काय आहे प्रकरण
राज्यात फोन टॅपिंग प्रकरणात तयार केलेल्या अहवालामुळे एकच खळबळ माजली होती. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याद्वारे महाराष्ट्र पोलीस दलातील बदल्यांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचार प्रकरणातील अहवाल लिक झाला होता. अहवाल लिक झाला तेव्हा रश्मी शुक्ला या गुप्तचर विभागाच्या आयुक्त होत्या. तसेच नेत्यांचे आणि अधिकाऱ्यांचे फोन टॅप करण्यात आले तेव्हा जयस्वाल हे राज्याचे डीजीपी होते.