मुंबई - रेडियस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संजय छाबरिया ( Sanjay Chhabria Arrest ) यांना येस बँक-डीएचएफएल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ( Yes Bank Scam ) आज सीबीआयने मुंबई अटक केली आहे. त्यांना उद्या शुक्रवारी मुंबईतील सीबीआयच्या विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
काय आहे प्रकरण? - संजय छाबरिया यांच्या संबंधित ठिकाणे फेब्रुवारीमध्ये सीबीआयने रेडियस डेव्हलपर्सशी संबंधित 6 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. रेडियस डेव्हलपर्स हे कर्जबाजारी दिवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे सर्वात मोठे कर्जदार होते. सीबीआय येस बँकेचे माजी सहसंस्थापक राणा कपूर आणि डीएचएफएल लिमिटेड यांची मार्च 2020 पासून चौकशी करत आहे. रेडियस डेव्हलपर्सकडे डीएचएफएलचे 3000 कोटींहून अधिक कर्ज होते. रेडियस ग्रुप हा DHFL च्या सर्वात मोठ्या कर्जदारांपैकी एक होता. या ग्रुपने मुंबईतील एका निवासी प्रकल्पासाठी कर्ज घेतले होते. रेडियस ग्रुपचे कर्ज आणि व्याज तब्बल 3 हजार कोटी रुपये होते. गेल्या आठवड्यात अंमलबजावणी संचालनालयाने येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर आणि दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे प्रोमोटर्स कपिल आणि धीरज वाधवन यांनी संशयास्पद व्यवहारांद्वारे 5 हजार 50 कोटी रुपयांच्या निधीची उधळपट्टी केल्याचा आरोप केला होता. ईडीने म्हटले होते की येस बँकेने एप्रिल 2018 ते जून 2018 दरम्यान डीएचएफएलकडून 3 हजार 700 कोटी रुपयांचे डिबेंचर खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे ही रक्कम डीएचएफएलकडे वर्ग करण्यात आली. त्यानंतर डीएचएफएलने डीओआयटी अर्बन व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडला 600 कोटी रुपयांचे कर्ज दिले.
हेही वाचा - Raj Thackeray Aurangabad Sabha : अखेर राज ठाकरेंची तोफ धडाडणार; औरंगाबादच्या सभेसाठी परवानगी