मुंबई - पश्चिम बंगालमधील बिरभूम जिल्ह्यात 22 मार्च रोजी झालेल्या हिंसेत 8 लोक जिवंत जाळली गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने 4 संशयितांना मुंबईतून अटक केली आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाने 21 मार्च रोजी बिरभूम हिंसेच्या घटनेवर CBI च्या प्राथमित तपास रिपोर्ट रेकॉर्डमध्ये घेतला होता. या प्रकरणातील सीबीआयची मोठी कारवाई मानली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये बाप्पा एसके साल मोहम्मद, साबू एसके सद्रील एसके, ताज मोहम्मद चांद, सेराजुल एसके पोल्टू या 4 आरोपींना आज CBI ने अटक केल्यानंतर या सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाकडून त्यांची ट्रान्झिट रिमांड मागण्यात आले असून त्यांना रिमांड मंजूर करण्यात आल्यानंतर या सर्व आरोपींना CBI अधिकारीकडून पश्चिम बंगाल नेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
तृणमूल काँग्रेसचे (TMC) उपसरपंच भडू शेख यांची बोगतू गावात मार्च 21 रोजी हत्या करण्यात आली. यानंतर रामपूरहट येथे हिंसेची घटना घडली. येथे संतापलेल्या जमावाने 8 घरे पेटवून दिली. यात 8 लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश होता. या प्रकरणाचा तपास पश्चिम बंगाल सरकारने सीआयडीला देण्यात आला होता. त्यानंतर एका जनहित याचिका नंतर पश्चिम बंगाल उच्च न्यायालयाने सीबीआयकडे हा तपास दिला होता. आता या प्रकरणात सीबीआयला मोठ यश मिळाले आहे. यापूर्वी गोरखनाथ मंदिरात हल्ला झाला होता. यात अहमद मुर्तझा अब्बासी याला पोलिसांनी अटक केली आहे. हा देखील सानपाडा येथील असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे झालेल्या हल्ल्यांमधील मुंबई कनेक्शन समोर आल्यामुळे चिंता वाढली आहे.
काय होते सीबीआय रिपोर्टमध्ये? : सीबीआयने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले, की या प्रकरणात पुराव्याचा एक मोठा भाग नष्ट करण्यात आला आहे. तर भादू शेख यांच्या हत्या प्रकरणात राज्य सरकारने उच्च न्यायालयात सांगितले की ही केस पोलिसांकडून पाहिली जात आहे. त्यात सीबीआयला देण्याची काही आवश्यकता नाही.
काय आहे प्रकरण ? : टीएमसी नेत्याच्या हत्येनंतर 22 मार्च रोजी बंगालमधील बीरभूम हिंसाचार उसळला होता. त्यात एका घराला लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालात पीडितांना जिवंत जाळण्यापूर्वी मारहाण करण्यात आल्याचाही धक्कादायक बाब समोर आली होती. बंगाल सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना केली होती. तसेच याप्रकरणी आतापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली होते.