मुंबई - राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सोशल मीडियावर बदनामकारक मजकूर आणि अपशब्द वापरणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी लेखी तक्रार करण्यात आली होती. मुंबई भाजपाचे सरचिटणीस मोहित भारतीय यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सांताक्रूझ पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच अपशब्द वापरणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
देवेंद्र फडणवीसांविरोधात सोशल मीडियावर शिवीगाळ करणाऱ्यावर गुन्हा दाखल अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन काही भाडोत्री लोकांकडून प्रतिष्ठित व्यक्तीविरूद्ध शिवीगाळ, अपमानास्पद भाषा वापरून बदनामी केली जाते. अशा वाईट प्रवृत्तींना आळा बसावा तसेच संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय यांनी तक्रारीतून केली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सोशल मीडियावर शिवीगाळ आणि बदनामी करण्याचे षडयंत्र काही व्यक्तींकडून सुरू होते. आता पोलिसांनी यासंदर्भात तक्रार दाखल करून घेतली आहे, असे भारतीय म्हणाले.विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वारंवार समाज माध्यमांवर अपप्रचार आणि बदनामी करण्याचे षड्यंत्र अनेकांकडून होत आहे. याला आळा बसावा आणि कोणत्याही व्यक्ती विरोधात बदनामी होऊ नये, यासाठी भाजपच्या मोहित भारतीय यांनी तक्रार दाखल केली होती.
काही लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देवेंद्र फडणवीस यांचा अपप्रचार करत आहेत. याविरोधात कारवाई करण्यासाठी सायबर सेलकडे मागणी करण्यात आलेली आहे असं मोहित भारतीय यांनी सांगितले.