मुंबई - मुंबईत स्टॉक ब्रोकर जिग्नेश मेहता ( Stockbroker Jignesh Mehta ) विरुद्ध मॉडेलचा विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल ( case registered against Jignesh Mehta ) करण्यात आलेला आहे. त्याच्यावर कलम 354, 354B बी, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधेरी एमआयडीसी येथे त्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनयभंग प्रकरणी गुन्हा : मुंबईत स्टॉक ब्रोकर जिग्नेश मेहता विरुद्ध मॉडेलचा विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ह्या मॉडेलला जिग्नेश मेहताने पीडितेला मुंबईत भेटण्यास बोलावले होते. त्या पीडित महिलेला ब्रोकर जिग्नेश हा अंधेरी एमआयडीसीमधील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. आपण अनेक बॉलिवूड ( Bollywood producers) निर्मात्यांना ओळखतो असे स्टॉक ब्रोकर जिग्नेश मेहताने तिला सांगितले.
हॉटेलमध्ये नेत लैंगिक अत्याचार : तसेच चित्रपटात काम मिळवायचे असेल तर तुला मदत करतो. चित्रपट मिळवून देतो असे, देखील पीडित मॉडेलला त्यांनी सांगितले. सूत्रांच्या माहिती नुसार शुक्रवारी 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी एका हॉटेलच्या खोलीत नेले. जेवणाचे बहाण्याने हॉटेलमध्ये नेऊन पीडितेवर लैंगिक अत्याचार ( Attempted sexual assault ) करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ( Andheri MIDC Police Station ) एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - woman raped by three men : ३५ वर्षीय महिलेवर तीन नराधमांचा बलात्कार