मुंबई - रेल्वेचा आरआरबी-एनटीपीसी ( Railway NTPC Exam ) परीक्षेचा निकालावरून बिहारमधील विद्यार्थिनी जोरादार आंदोलन केले होते. संतापलेल्या विद्यार्थांनी ठिकाणी निदर्शने केली आणि यादरम्यान एका ट्रेनला ( Train Burnt By Student ) आग लावण्यात आली. या घटनेनंतर आता रेल्वे भरती बोर्डाला शहाणपण सुचले आहेत. देशातील सर्व रेल्वे भरती बोर्डानी उमेदवारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले आहेत. उमेदवारांचा काही समस्या किंवा तक्रारी असल्यास थेट रेल्वे भरती मंडळाच्या अध्यक्षांना भेटता येणार आहे.
समिती स्थापन -
रेल्वे भरती बोर्डाने म्हणजेच आरआरबीने नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीअंतर्गत (एनटीपीसी) नोकरभरतीसाठी सीबीटी-२ परीक्षाचे निकाल १४ आणि १५ जानेवारी २०२२ रोजी जारी केले. त्याच्या आधारे सीबीटी-२ म्हणजेच दुसऱ्या टप्प्याची परीक्षा घेण्याच्या दृष्टीने उमेदवारांची यादी निश्चित करणे आवश्यक होते. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आरआरबी एनटीपीसीचा निकाल देताना घोटाळा करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. याच मुद्यावरून बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन सुरु झाले. हे आंदोलनाने चांगले हिंसक वळण घेतले होते. त्यानंतर आता एनटीपीसी आणि आरआरसी परीक्षार्थी उमेदवारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर लक्ष देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने एक उच्चाधिकार समिती स्थापन केली आहे. सीईएन 01/2019 (एनटीपीसी) च्या पहिल्या टप्प्यातील सीबीटीचा निकाल आणि विद्यमान शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना प्रभावित न करता दुसऱ्या टप्प्यातील सीबीटीसाठी शॉर्टलिस्टिंग करताना उमेदवारांसाठी वापरलेली पद्धत, सीईएन आरआरसी 01/2019 च्या दुसऱ्या टप्प्यातील सीबीटीचा वापर या मुद्द्यावर उच्चाधिकार समिती स्थापन केली आहे.
इथे करा तक्रार -
एनटीपीसी आणि रेल्वे रिक्रूटमेंट सेल उमेदवारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी रेल्वे भरती मंडळाने सकारात्मक पाऊल उचलले आहे. उमेदवार 28, 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 या वेळेत त्यांच्या समस्या किंवा तक्रारी असल्यास उमेदवार मुंबई सेंट्रल येथील विभागीय रेल्वे कार्यालय परिसर रेल्वे भरती मंडळामध्ये रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड, मुंबईच्या अध्यक्षांना भेटू शकतात. उमेदवार त्यांच्या तक्रारी asrrbmumbai@gmail.com या ईमेलवर त्यांचे नाव, मोबाईल नंबर आणि एनटीपीसी परीक्षेचा रोल नंबर देऊन त्यांच्या तक्रारी ईमेल करू शकतात, अशी माहिती मध्य आणि पश्चिम रेल्वेद्वारे देण्यात आली आहे.
हेही वाचा - Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या घटली, १३८४ नव्या रुग्णांची नोंद, १२ जणांचा मृत्यू