ETV Bharat / city

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई गुन्हे शाखेकडून अटक; पोर्नोग्राफी प्रकरणात सहभागाचा संशय - Mumbai Police Commissioner on Raj Kundra

मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणाले, की राज कुंद्रा हा पोर्नोग्राफी फिल्मच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मानला जात आहे. त्याच्याविरोधात आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत.

Raj Kundra
Raj Kundra
author img

By

Published : Jul 19, 2021, 11:22 PM IST

Updated : Jul 20, 2021, 11:24 AM IST

मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्रा हा अडचणीत सापडला आहे. गुन्हेशाखेने पोर्नोग्राफी फिल्मस आणि हे फिल्म काही अॅपमधून प्रदर्शित केल्याबद्दल त्याला अटक केली आहे.

राज कुंद्राला वैद्यकीय तपासणीनंतर घेऊन जाताना पोलीस पथक

मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणाले, की राज कुंद्रा हा पोर्नोग्राफी फिल्मच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मानला जात आहे. त्याच्याविरोधात आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने पोर्नोग्राफी तयार करण्याच्या गुन्ह्यात राज कुंद्रासह 11 आरोपींना अटक केली आहे.

फेब्रुवारी 2021 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये मुंबईत अश्लील सिनेमा व चित्रफित बनवले जात असून ते मोबाईल ॲपद्वारे प्रदर्शित केली जात होते. याप्रकरणी गुन्हे शाखा तपास करत होती. त्याच बरोबर याप्रकरणी राज कुंद्राचीही चौकशी करण्यात आली होती. आज सगळ्या प्रकरणाचे कुंद्रा मुख्य सूत्रधार आहेत, असे पुराव्यांनिशी दिसून येत आहे. त्यामुळे त्याला अटक केल्याचे गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले. यापूर्वीही राज कुंद्राची पोलिसांनी विविध प्रकरणात चौकशी केली होती.

हेही वाचा-ASHADHI WARI 2021: "बा पांडुरंगा, शेतशिवारात समृद्धी येऊ दे, कोरोनाचे संकट दूर कर" उपमुख्यमंत्र्यांनी घातले साकडे

2019 मध्ये ईडीने केली होती राज कुंद्राची चौकशी

इक्बाल मिर्ची प्रकरणात अटक करण्यात आलेल्या रणजीत सिंग बिंद्रा या आरोपीच्या जबाबावरुन कुंद्रा याचे नाव समोर आले आहे. कुंद्रा याचे इक्बालसोबत संबंध असल्याचा ईडी अधिकाऱ्यांना संशय आहे. 2011 मध्ये आर.के.डब्ल्यू. नावाची कंपनी कुंद्रा यांनी विकत घेतली होती. याबरोबरच मुंबईतील विमानतळाजवळ एक भूखंडही कुंद्रा यांनी खरेदी केला होता. मात्र, या प्रकरणात आपले इक्बालसोबत कुठलेही संबंध नव्हते, असे म्हणत कुंद्रा यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते.

हेही वाचा- Pegasus Snooping : अमित शाहांनी राजीनामा देण्याची काँग्रेसची मागणी; वाचा, काय आहे प्रकरण?

2014 मध्ये सुरू करण्यात आलेल्या सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर तत्कालीन संचालक म्हणून राहिलेल्या शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा या दोघांकडून पीडित अनिवासी भारतीयाला मोठ्या नफ्याचे आमिष दाखविण्यात आले होते. मात्र सतयुग गोल्ड स्कीममध्ये आपली फसवणूक झाल्याचा आरोप सचिन जे जोशी यांनी त्यांच्या तक्रारीत केला आहे. यामुळे सचिन जोशी या अनिवासी भारतीयाने मुंबईतील खार पोलीसांनी मार्च 2020 मध्ये तपास केला होता.

पहाटे करण्यात आली वैद्यकीय तपासणी

पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारा राज कुंद्राला गुन्हे शाखेच्या कार्यालयातून जे.जे. रुग्णलायत वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. सुमारे अर्ध्या तासानंतर त्याला राज कुंद्राला रुग्णालयात नेण्यात आले.

Last Updated : Jul 20, 2021, 11:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.