मुंबई - दादर टीटी येथे २७ ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा सातच्या सुमारास बेस्ट बसने डंपरला धडक दिली. या धडकेत बसमधील ड्राइव्हर, कंडक्टरसह प्रवासी असे एकूण आठ जण जखमी झाले. त्यापैकी ५ जण गंभीर जखमी होते. या सर्वांवर सायन रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यापैकी बस ड्रायव्हर राजेंद्र यांचा आज सकाळी साडे सातच्या सुमारास मृत्यू झाल्याची माहिती सायन रुग्णालयाकडून देण्यात आल्याची पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
३ रुग्णांची प्रकृती स्थिर
बेस्ट उपक्रमाची बस मार्ग क्रमांक २२ ही मरोळ मोरोशी ते पायधुनी या मार्गावर चालते. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा सातच्या सुमारास दादर टीटी येथे या बसच्या चालकाने डम्परला मागून धडक दिली. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. या धडकेमुळे बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या बसमधून प्रवास करणारे प्रवासी आणि कंडक्टर, ड्राइव्हर या अपघात जखमी झाले आहेत. जखमी ८ जणांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी कंडक्टर, ड्रायव्हर तसेच इतर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले होते. तर इतर ३ रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सायन रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर यांनी दिली होती.
४ जणांना डिस्चार्ज
गंभीर जखमी असलेल्यांपैकी बसचे ड्रायव्हर राजेंद्र यांचा आज २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजता मृत्यू झाला. सध्या या अपघातातील ३ जण अॅडमिट असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. तर ४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती सायन रुग्णालयाचे सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. रणधीर सिंग यांनी दिल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून कळविण्यात आले आहे.
मृताचे नाव -
- १) राजेंद्र, ड्रायव्हर, वय ५३ वर्ष
गंभीर जखमींची नावे -
- १) काशीराम धुरी, कंडक्टर, ५७ वर्ष
- २) रुपाली गायकवाड, प्रवासी, ३६ वर्ष
३) सुलतान, प्रवासी, ५० वर्ष
डिस्चार्ज दिलेल्यांची नावे -
- १) मन्सूर अली, प्रवासी, ५२ वर्ष
- २) श्रावणी म्हस्के, प्रवासी, १६ वर्ष
- ३) वैदेही बामणे, प्रवासी, १७ वर्ष
- ४) ताहीर हुसेन, प्रवासी, ५२ वर्ष