ETV Bharat / city

खुशखबर! ब्रिटन रिटर्न 26 प्रवाशांचा एनआयव्हीचा अहवाल निगेटिव्ह - ब्रिटन रिटर्न प्रवाशांबद्दल बातमी

आतापर्यंत नव्या कोरोनाच्या तपासणीसाठी एनआयव्ही पुणे कडे पाठवण्यात आलेल्या ६१ अहवालापैकी २४ अहवाल नीगेटिव्ह आले आहेत. महाराष्ट्रात नव्या स्ट्रेनचा अजून एकही रुग्ण आढळलेला नाही ही दिलासादायक बाब आहे.

britain-returns-26-passengers-niv-report-negative
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी खुशखबर! ब्रिटन रिटर्न 26 प्रवाशांचा एनआयव्हीचा अहवाल निगेटिव्ह
author img

By

Published : Jan 2, 2021, 1:24 AM IST

Updated : Jan 2, 2021, 6:55 AM IST

मुंबई - आज नव्या वर्षाचा पहिला दिवस असून पहिल्याच दिवशी सगळ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे. आतापर्यंत नव्या कोरोनाच्या तपासणी साठी एनआयव्ही (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी) पुणे यांच्याकडे पाठवण्यात आलेल्या 61 अहवालापैकी 24 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ही खूप मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे. देशात नव्या कोरोनाचा शिरकाव झाला असताना (आतापर्यंत देशात 29 रुग्ण नव्या स्ट्रेनचे आढळले आहेत) महाराष्ट्र मात्र अजुन तरी या संकटापासून दूर आहे.

आतापर्यंत 4771 प्रवासी दाखल -

ब्रिटिनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळला. या विषाणू 70 टक्के अधिक वेगाने पसरतो. त्यामुळे या विषाणूचा धसका सगळ्या जगाने घेतला आहे. कारण हा विषाणू हळूहळू एक-एक देशात पसरू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने खबरदारी म्हणून ब्रिटनची विमानसेवा 7 जानेवारीपर्यंत बंद केली आहे. मात्र, ब्रिटनवरून आलेल्या प्रवाशांचा शोध घेत त्यांची चाचणी केली जात आहे. युरोपातुन येणाऱ्यांची ही चाचणी करत त्यांना क्वारंटाइन केले जात आहे. अशाप्रकारे आतापर्यंत, 4771 प्रवाशांना क्वारंटाइन केले असून यातील 3273 जणांची आरटी पीसीआर चाचणी करण्यात आली आहे.

आतापर्यंत राज्यात 67 जण पॉझिटिव्ह -

ब्रिटन आणि युरोपातुन आलेल्याची चाचणी केली जात आहे. त्यानुसार आतापर्यंत चाचणी केलेल्या पैकी 3273 जणांपैकी 67 जण पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्वांनावर उपचार सुरू असून यातील 61 जणांचे नमुने नव्या स्ट्रेनच्या तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती डॉ प्रदीप आवटे, राज्याचे रोग सर्वेक्षण अधिकारी, आरोग्य विभाग यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. तर लवकरच 6 नमुने एनआयव्हीकडे पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

रुग्णांच्या संपर्कातील 26 जण पॉझिटिव्ह -

ब्रिटन आणि युरोपातुन आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील लोकांचाही शोध घेत त्यांची तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार आतापर्यंत 477 जणांचा शोध घेण्यात आला आहे. यातील 279 जणांची कोरोना चाचणी केली असता 26 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.

दिलासादायक! राज्यात शिरकाव नाही -

61 जणांचे नमुने एनआयव्हीकडे पाठवण्यात आले आहेत. यातील 24 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती डॉ आवटे यांनी दिली आहे. ही महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक बाब म्हणावी लागेल. कारण भारतात नव्या स्ट्रेनचा शिरकाव झाला आहे. आतापर्यंत, 1 जानेवारीपर्यंत देशात नव्या स्ट्रेनचे 29 रुग्ण आढळले आहेत. अशावेळी सुदैवाने महाराष्ट्र नव्या स्ट्रेनच्या संकटापासून दूर राहिले आहे. राज्यात अजून याचा शिरकाव झालेला नाही. पण असे असले तरी अजून अहवाल येणे बाकी असल्याने धाकधूक कायम आहे. तर नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे.

मुंबईतल्या पॉझिटिव्ह प्रवाशांचा आकडा 29 वर -

मुंबईत मोठ्या संख्येने ब्रिटन आणि युरोपातुन येणाऱ्या-जाणाऱ्याची संख्या आहे. त्यामुळे मुंबईलाच नव्या कोरोनाच्या धोक्याची भीती जास्त आहे. त्यामुळेच राज्य सरकार आणि मुंबई महानगर पालिका कुठेही ढिलाई न करता कडक उपाययोजना करत या नव्या संकटापासून मुंबईला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान राज्यात जे 67 रुग्ण आढळले आहेत यातील 29 रुग्ण मुंबईतले आहेत. तर 12 रुग्ण पुण्यातील, 8 ठाण्यातील, 7 नागपूरातील, नाशिक, औरंगाबाद, रायगड, बुलढाणा प्रत्येकी 2 आणि नांदेड, वाशिम प्रत्येकी 1 असे हे रुग्ण आढळले आहेत. यातील 61जणांचे नमूने एनआयव्हीकडे पाठवण्यात आले आहेत. 6 लवकरच पाठवण्यात येणार आहेत.

Last Updated : Jan 2, 2021, 6:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.