ETV Bharat / city

Nawab Malik Criticise Devendra Fadnavis : ...हे कट कारस्थान फडणवीसांचे - नवाब मलिकांचे गंभीर आरोप

राज्यातील महाविकास आघाडीतील ( Maharashtra Mahavikas Aghadi Government ) नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणा लावण्याचे काम देवेंद्र फडणवीस ( Opposition Leader Devendra Fadnavis ) यांचे आहे, असा आरोप मलिक यांनी केला ( Minister Nawab Malik Criticise Devendra Fadnavis ) आहे. तसेच, राज्य सरकार पडणार नाही, असेही त्यांनी म्हटलं.

Nawab Malik Criticize Devendra Fadnavis
Nawab Malik Criticize Devendra Fadnavis
author img

By

Published : Feb 9, 2022, 2:35 PM IST

मुंबई - महाविकास आघाडी सरकारमधील ( Maharashtra Mahavikas Aghadi Government ) नेत्यांच्या मागे ईडी, तसेच केंद्रीय तपास यंत्रणा लावल्या आहेत. मात्र, या सर्वांच्या मागे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Opposition Leader Devendra Fadnavis ) असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिक यांनी ( Minister Nawab Malik Criticise Devendra Fadnavis ) केला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नबाव मलिक म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी राज्य सरकार पडणार नाही. पण, 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्राचे सरकार आम्ही ताब्यात घेऊ. महाविकास आघाडी सरकारच्या मागे ईडी, केंद्रीय तपास यंत्रणा लावण्याचे कट-कारस्थान देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येऊन राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र, तेव्हापासूनच हे सरकार पाडण्यासाठी अनेक प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आले. यासाठी केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारचे नेते घाबरणार नाहीत, असा इशाराही पुन्हा एकदा नवाब मलिक त्यांच्याकडून देण्यात आला आहे.

ईडीच्या निवृत्त अधिकाऱ्यांना भाजपाचे तिकीट

राजेश्वर सिंग ईडीचे अधिकारी निवृत्ती घेतात आणि त्यांना भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेश मधून तिकीट देते. याचाच अर्थ ईडीचे अधिकारी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्या अधिकार्‍यांनाही कळलं पाहिजे की भारतीय जनता पक्ष किंवा त्यांचा वापर करून घेत आहे. सत्तापरिवर्तन झाल्यानंतर त्याच अधिकाऱ्यांना उत्तर द्यावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना लिहिलेली पत्र हे सत्य परिस्थिती आहे. तपास यंत्रणांकडून करण्यात आलेल्या कारवायांना कोणीही घाबरत नाही, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - Nana Patole Criticism PM : पंतप्रधानाच्या 'त्या' वक्तव्याविरोधात राज्यात काँग्रेसचे आंदोलन ; नाना पटोलेंची टीका

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.