मुंबई - आम्ही कधीही सत्य लपवले नाही, परंतु खोटे आरोप सहन करू शकत नाही... समीन यांचे पूर्वीचे लग्न विशेष विवाह कायद्यानुसार झाले होते. ते दोघेही वेगवेगळ्या धर्माचे होते. आमच्याकडे कायदेशीर कागदपत्रे आहेत, त्यात स्पष्ट लिहिले आहे की तो हिंदू आहे - क्रांती रेडकर
Cruise Drug Case: माझ्या नावात कोणीतरी छेडछाड केली - समीर वानखेडेंचे वडील - etv bharat live
15:07 October 27
आमच्याकडे कायदेशीर कागदपत्र - क्रांती रेडकर
-
#WATCH | We never denied anything, but can't bear lies...Both of them belonged to different religions... and married under Special Marriage Act. We have legal documents, how is this forgery. It's clearly written here that he is a Hindu: Kranti, NCB officer Sameer Wankhede's wife pic.twitter.com/uSYd6pk4sJ
— ANI (@ANI) October 27, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | We never denied anything, but can't bear lies...Both of them belonged to different religions... and married under Special Marriage Act. We have legal documents, how is this forgery. It's clearly written here that he is a Hindu: Kranti, NCB officer Sameer Wankhede's wife pic.twitter.com/uSYd6pk4sJ
— ANI (@ANI) October 27, 2021#WATCH | We never denied anything, but can't bear lies...Both of them belonged to different religions... and married under Special Marriage Act. We have legal documents, how is this forgery. It's clearly written here that he is a Hindu: Kranti, NCB officer Sameer Wankhede's wife pic.twitter.com/uSYd6pk4sJ
— ANI (@ANI) October 27, 2021
14:35 October 27
समीर वानखेडेंचा 'निकाहनामा' समोर: 'स्वीट कपल' म्हणत नवाब मलिक यांचं नवीन ट्वीट
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक हे अमली पदार्थ विरोधी पथकाचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांच्या विरोधात अनेक आरोप करत आहेत. यातच त्यांनी आज पुन्हा एकदा नवीन ट्विट करत या आरोपांमध्ये भर टाकली. नवाब मलिक यांनी आज नवीन ट्विट करत समीर वानखडे यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो त्यांनी ट्विट केला आहे. यासोबतच समीर वानखेडे आणि शबाना कुरेशी यांच्या लग्नाचा निकाहनामा असल्याचाही त्यांनी ट्विट करत दावा केला आहे. या निकाहनामा मध्ये समीर दाऊत वानखडे अशा नावाचा उल्लेख आहे. हे लग्न 6 डिसेंबर 2008 साली झाला असल्याचंही नवाब मलिक यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितला आहे.
14:33 October 27
आता हा दाढीवाला कोण? नवाब मलिकांचा नवा खुलासा; त्याचा शोध घेण्याचे एनसीबीला आवाहन
राज्याची परवानगी न घेता कोरोनाचे नियम तोडून क्रुझ पार्टीवर छापा टाकण्यात आला. त्यात एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया होता. तो दाढीवाला असून तिथे नाचत होता. काही लोकांच्या म्हणण्यानुसार तो तिहार जेल आणि राजस्थानमधील जेलमध्ये होता. तो दाढीवाला माफिया कोण? दाढीवाल्याची मित्रता वानखेडेसोबत आहे का? त्याला अटक का करण्यात आली नाही, असा सवाल नवाब मलिक यांनी पत्रकारपरिषदेत केला.
14:32 October 27
नवाब मलिक एकप्रकारे समीर वानखेडेंना धमकावत आहेत, मंगलप्रभात लोढा यांची राज्यपालांकडे तक्रार
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणामध्ये एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर दररोज नवनवीन आरोप करत आहेत. हे आरोप करताना ज्या पद्धतीची भाषा ते वापरत आहेत व ज्या प्रकारे त्यांना धमकावत आहेत, या प्रकरणाची तक्रार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मुंबई भाजप अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.
14:30 October 27
समीर वानखेडे मुस्लिमच; निकाह पढवणाऱ्या मौलानांचा दावा
2006 मध्ये लग्नादरम्यान समीर वानखेडे याने स्वत:ला मुस्लिम असल्याचे सांगितले होते. २००६ साली समीर वानखेडे ह्यांचा शबाना ह्यांचाशी निकाह झाला. निकाहच्यावेळी समीर आणि शबाना दोघेही मुस्लीम धर्मीय होते. जर समीर वानखेडे मुस्लिम नसते तर मी निकाह पढवला नसता, असा दावा मौलाना अहमद यांनी केला.
12:47 October 27
NCB Inquiry - माझ्या नावात कोणीतरी छेडछाड केली - ज्ञानदेव वानखेडे
मुंबई - समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडेंनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन जातीचा दाखला प्रसारमाध्यमांना दाखविला. या दाखल्यावर समीर ज्ञानदेव वानखेडे असे नाव असल्याचा उल्लेख असल्याचे ज्ञानदेव वानखेडेंनी सांगितले. यावेळी नवाब मलिक यांच्या आरोपाचे खंडन करत त्यांच्याविरोधात कोर्टात जाणार असल्याचे ते म्हणाले. समीर आणि पहिल्या पत्नीत कायदेशीर घटस्फोट झाल्याचेही ते म्हणाले. कायदेशीर कागदपत्रांमध्ये ज्ञानदेव वानखेडे अशीच नोंद आहे. माझ्या नावात कोणीतरी छेडछाड केली आहे असेही ते म्हणाले.
11:49 October 27
Breaking News - एनसीबीचे ५ सदस्यीय पथक मुंबईत दाखल, प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपांबाबत चौकशी होणार
मुंबई - एनसीबीचे दिल्लीतील ५ सदस्यीय पथक मुंबईत दाखल झाले आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी तसेच आर्यन खान अटक प्रकरणात पंच असलेले प्रभाकर साईल यांना एनसीबीने समन्स बजावलं आहे. त्यांनी आर्यन खान अटक प्रकरणात एनसीबीचे अधिकारी पैसे उकळणार होते, असा गंभीर आरोप केलाला आहे. याच आरोपानंतर चौकशीसाठी हे समन्स पाठवण्यात आले आहे. आज (बुधवार) 27 ऑक्टोबर रोजी साईल यांना एनसीबीसमोर हजर राहिला सांगितले आहे.