मुंबई: मुख्यमंत्री पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर वर्षा बंगल्यावर राहायला जाणार नाही, अशी भूमिका घेतलेल्या मुख्यमंत्र्यांनी CM Eknath Shinde अल्पावधीतच पाच बंगले ताब्यात ठेवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. नंदनवन, अग्रदूत, वर्षा, तोरणा आणि आता ब्रम्हगिरी बंगल्याचा यात समावेश असणार आहे. ब्रम्हगिरी यापूर्वी संदीपान भुमरे यांच्या ताब्यात होता. तेथे मुख्यमंत्री शिंदे कार्यालय सुरू करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे शासकीय बंगले नको, म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना बंगल्याची हौस सुटेना अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
नंदनवन येथूनच कामकाज करायला सुरुवात राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा मुक्काम हा मलबार हिलवरील 'वर्षा' बंगल्यावर असतो. 'वर्षा' बंगला हे सत्तेचे केंद्र मानले जाते. त्यामुळे महाराष्ट्राच्या सत्ताकारणात वर्षा बंगल्याला कमालीचे महत्त्व आहे. एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदेंच्या बंडखोरीने राज्यातील सरकार अल्पमतात आल्याने तत्कालीन मुख्यमंत्री Uddhav Thackeray उद्धव ठाकरे मातोश्रीवर राहायला गेले. मुख्यमंत्री पदाचा आणि कोणत्याही शासकीय बंगल्याचा मोह नाही, हे ठाकरे यांनी दाखवून दिले. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी राहायला जाणार नाही, अशी घोषणा करत बंगल्याचा मोह नाही. हे दाखवून देण्यासाठी मलबार हिल येथील नंदनवन येथूनच कामकाज करायला सुरुवात केली. परंतु, आजच्या घडीला मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थान वगळता चार बंगले ताब्यात ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हा बंगला अपुरा पडू लागला एकनाथ शिंदे यांच्याकडे 'नंदनवन' आणि 'अग्रदूत' असे दोन बंगले आहेत. गेल्या सात-साडेसात वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत शिंदे यांच्यासाठी 'नंदनवन' बंगला अतिशय फलदायी ठरल्याचे बोलले जाते. २०१४ मध्ये शिंदे यांचा पहिल्यांदा फडणवीस सरकारमध्ये मंत्री म्हणून समावेश झाला होता. तेव्हा त्यांना 'नंदनवन' बंगला मिळाला होता. शिंदे त्या दिवसांपासून नंदनवन येथून कामकाज पाहत आहेत. सध्या शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यभरातील नेते, खासदार, आमदार, कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी येत आहेत. त्यामुळे हा बंगला अपुरा पडू लागला आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने 'नंदनवन' हा पोलिसांसाठी गैरसोयीचा ठरत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा राजशिष्टाचार लक्षात घेऊन शिंदे यांनी 'वर्षा'वर मुक्कामाला यावे, अशी विनंती त्यांना करण्यात आली. परंतु, शासकीय कामकाजाव्यतिरिक्त बंगल्यावर राहायला जाणार नसल्याचा निर्धार मुख्यमंत्री शिंदे यांनी केला होता. मात्र, आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या चार बंगले ताब्यात असताना पाचवा बंगला कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ब्रम्हगिरी सुद्धा मागितला वर्षा निवासस्थान नजीक तोरणा बंगला आहे. हा बंगला मुख्यमंत्री सध्या वापरत आहेत. आता मंत्रालयासमोरील ए -४ रांगेतील ब्रम्हगिरी बंगला मुख्यमंत्री शिंदे यांनी शासकीय कामांसाठी वापरास घेणार आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर अभ्यंगत मंत्रालयात येत असतात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या दालनाबाहेर गर्दी होते. राज्यातील प्रत्येक जनतेची कामे व्हावीत. अडलेल्यांना न्याय मिळावा, यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी ब्रम्हगिरी बंगला घेणार आहेत. विशेष प्रशासकीय अधिकारी याकरिता नियुक्त केला जाणार आहे. त्यामुळेच संदीपान भुमरे यांना रत्नसिंधु बंगला देऊन या बंगल्याची दुरुस्ती करण्यात येत आहे. येत्या दिवाळीपर्यंत कामकाज पूर्ण होऊन तो वापरात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.