ETV Bharat / city

आवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही आता दोन्ही लस बंधनकारक - etv bharat marathi

कोरोना लसींचे दोन डोस घेऊन १४ दिवसांचा कालावधी पूर्ण होत नाही, तोपर्यंत सर्वसामान्यांना लोकल प्रवासाला बंदी आहे. आवश्यक सेवेत काम करणाऱ्यांना या नियम आतापर्यंत लागू नव्हता. वैद्यकीय कारणास्तव तसेच वृद्धापकाळामुळे लस न घेऊ शकणारे लोक सामील होते. मात्र आता लसीकरणाचा मुबलक साठा आणि वेग वाढल्याने लस अनिवार्य केली आहे.

Both vaccines are now mandatory for essential service personnel
आवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही आता दोन्ही लस बंधनकारक
author img

By

Published : Oct 26, 2021, 4:03 PM IST

Updated : Oct 26, 2021, 8:13 PM IST

मुंबई - वैद्यकीय सेवा, दूरसंचार क्षेत्र, गॅस पुरवठा, जलपुरवठा शासकीय अधिकारी आदींना आता दोन्ही लस घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासंदर्भातील राज्य शासनाने परिपत्रक जारी केला आहे. अत्यावश्यक सेवे वर विपरित परिणाम होऊ नये, यासाठी लस बंधनकारक न करता पास दिला जात होता.

मासिक, त्रैमासिक पास मिळणार -

कोरोना लसींचे दोन डोस घेऊन १४ दिवसांचा कालावधी पूर्ण होत नाही, तोपर्यंत सर्वसामान्यांना लोकल प्रवासाला बंदी आहे. आवश्यक सेवेत काम करणाऱ्यांना या नियम आतापर्यंत लागू नव्हता. वैद्यकीय कारणास्तव तसेच वृद्धापकाळामुळे लस न घेऊ शकणारे लोक सामील होते. मात्र आता लसीकरणाचा मुबलक साठा आणि वेग वाढल्याने लस अनिवार्य केली आहे. त्यामुळे आवश्यक सेवेतील तसेच शासकीय सेवेतील लोकांना सामील केले आहे. यापुढे प्रवासासाठी सार्वत्रिक (युनिव्हर्सल) पास अशाच व्यक्तींना दिला जाईल. त्याच बरोबर लोकल किंवा पॅसेंजर ट्रेनने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी मासिक त्रेमासिक सहा मासिक पास त्याचा प्रवाशांना देण्यात येईल, असे राज्य शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.

कोरोनाचे दोन्ही डोस घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासास मुभा -

कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना १५ ऑगस्टपासून उपनगरीय लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. यापूर्वी गेल्या दीड वर्षांपासून अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आतापर्यंत त्यांनी लस घेतली आहे किंवा नाही हे न बघता रेल्वेचा पास देण्यात येत होते. कारण कोरोना काळात अत्यावश्यक सेवेवर विपरित परिणाम होऊ नयेत म्हणून ही मुभा देण्यात आली होती. मात्र, आता राज्य सरकारनेही मुभा काढून टाकण्यात आली आहे. कारण सध्या मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरु आहे. सध्या लसींचा साठाही मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सर्वसामान्य प्रवाशांप्रमाणेच लसीच्या दोन मात्र घेणाऱ्याच कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासात मुभा देणार आहे.

लोकल तिकिट मिळणार नाही -

सध्या युद्धपातळीवर कोविड लसीकरण मोहीम सुरु आहे. यामुळे आता लोकल प्रवासात सुद्धा लसीकरण या गटात सर्वांना समाविष्ट केले आहे. त्यामुळे आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सुद्धा सर्वसामान्य लसवंताप्रामणे लोकल प्रवासात मुभा देणार आहे. याशिवाय लसवंताना मासिक पासाप्रमाणे तीन, सहा महिन्यांचा पास मिळणार आहे. यापूर्वी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्रावर मिळणारे लोकलचे तिकिट देखील बंद करण्यात आले आहेत. या सर्व प्रवाशांना मासिक पास, त्रैमासिक पास, सहामाही पास आता घ्यावी लागणार आहे.

मुंबई लोकल धावणार पूर्ण क्षमतेने -

गेल्या वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले होते. या लॉकडाऊन काळात रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. नंतर 15 जून 2020 पासून, रेल्वेने राज्य सरकारने निवडलेल्या आणि रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या अत्यावश्यक सेवा श्रेणी कर्मचाऱ्यांनासाठी उपनगरीय सेवा सुरू केली होती. आता गेल्या काही महिन्यांपासून कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना उपनगरीय लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आले आहे. यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे. तर, नुकताच एका दिवसात 60 लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली. कोरोना पूर्वीच्या प्रवासी संख्येपेक्षा फक्त 25 टक्के प्रवासी संख्या कमी आहे. या सर्व प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी 95 टक्क्यांहून 100 टक्के फेऱ्या गुरुवारपासून चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा - मुंबईकरांसाठी खुशखबर.. तब्बल दीड वर्षानंतर गुरुवारपासून पूर्णक्षमतेने धावणार लोकल !

Last Updated : Oct 26, 2021, 8:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.