ETV Bharat / city

HC on Nitesh Rane's Bail : आमदार नितेश राणे यांना न्यायालयाचा मोठा झटका, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

शिवसेना कार्यकर्ता संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. भाजप आमदार नितेश राणे यांना न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. नितेश राणे यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयानेही फेटाळला ( HC on Nitesh Rane's Bail ) आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

Nitesh Rane
नितेश राणे
author img

By

Published : Jan 17, 2022, 12:25 PM IST

Updated : Jan 17, 2022, 2:26 PM IST

मुंबई - शिवसेना कार्यकर्ता संतोष परब हल्ल्याच्या आरोपावरून नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. भाजप आमदार नितेश राणे यांना न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. नितेश राणे यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयानेही फेटाळला ( High Court Refused Anticipatory Bail to Nitesh Rane ) आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

संतोष परब यांच्यावरील हल्लाचा मास्टरमाईंडला दिल्लीतून ताब्यात -

भाजपचे नेते तथा आमदार नितेश राणे यांच्यावर संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. आज सोमवार (दि.17) रोजी मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीनावर निकाल देत नितेश राणे यांचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांना कोणत्याहीक्षणी सिंधुदुर्ग पोलीस अटक करू शकते. संतोष परब यांच्यावरील या हल्ल्याच्या मास्टरमाईंडला दिल्लीतून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर संपूर्ण प्रकरणात नितेश राणेंचा हात असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाल्याचे म्हटले जातेय. यानंतर राणेंनी कोर्टात धाव घेतली होती. अखेर त्यांचा जामीन नाकारण्यात आला आहे.

मनीषा कायंदे यांनी नितेश राणे यांच्यावर टिका -

शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी नितेश राणे यांच्यावर टिका केली आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे, महाराष्ट्रात अशा प्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. सर्व कायदेशीर आणि न्यायालयीन प्रक्रिया आहे. न्यायालयाने योग्य तो निर्णय दिलेला आहे. राणे कुटुंबाची सिंधुदुर्गमध्ये गुंडगिरी आणि मस्तवालपणा आहे. त्याला न्यायालयाने चपराक लगावली आहे.

नितेश राणे अद्यापही फरार -

संतोष परब हल्ल्याप्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून नितेश राणे ते फरार होते. मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी नितेश राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत कुठलीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना देण्यात आले होते. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीनंतर अध्यक्ष पदग्रहण समारोहाच्या वेळी नितेश राणे हे समोर आले होते. मात्र ती आता कुठे आहे हे अद्यापी कुणाला माहीत नाही.

कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल -

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणेंना अटक करण्यात येणार होती. त्याबाबत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने नितेश राणेंचा जामीन फेटाळला होता. राणे यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात कलम 307 आणि 120 (ब) सह 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'राजकीय वैमनस्यामधून गुन्हा दाखल'

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रचारापासून दूर करण्यासाठी शिवसेनेने मला या प्रकरणात अडकवले आहे, असा आरोप अर्जात करण्यात आला होता. यामध्ये माझा सहभाग नसून राजकीय वैमनस्यामधून फिर्याद नोंदवण्यात आली असल्याचा दावाही करण्यात आला. त्यानंतर नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. यावर अखेर सुनावणी पार पडली.

हेही वाचा - उत्पल पर्रिकर-भाजप वादात संजय राऊतांची उडी, म्हणाले सगळ्यांनी साथ द्या

Last Updated : Jan 17, 2022, 2:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.