मुंबई दादरा नगर हवेली केंद्रशासित (Dadra Nagar Haveli) प्रदेशाचे स्व. माजी खासदार मोहन डेलकर (former MP Mohan Delkar) यांना आत्महत्येस (mohan delkar suicide case) प्रवृत्त केल्याप्रकरणी मुंबई मरीन लाईन पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेले गुन्हे रद्द (quash the charges in the suicide case) करा. असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (bombay high court) दिला आहे. डेलकर यांच्या कुटुंबीयांनी दादरा नगर हवेली मधील अनेक मोठे नेते तसेच अधिकाऱ्यांना मोहन डेलकर यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचे म्हटले होते. गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. डेलकर यांनी आत्महत्येच्या ठिकाणी 14 पानी चिठ्ठी लिहीत, मुंबईतील मरीन लाईन (marine line) येथील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती.
कोण होते मोहन डेलकर ( who was mohan delkar) 58 वर्षीय मोहन डेलकर हे साल 1989 पासून दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. ते दादरा आणि नगर हवेली येथून तब्बल 7 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. साल 2009 मध्ये ते काँग्रेस पक्षात दाखल झाले. परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरत मोठ्या मतांनी पुन्हा विजयी झाले होते.
संपुर्ण प्रकरण असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह 9 बड्या सरकारी अधिका-यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सिल्व्हासा येथील तत्कालीन जिल्हाधिकारी संदिप कुमार सिंह यांनाही याप्रकरणी आरोपी बनवण्यात आलं होतं. मरीन ड्राईव्ह येथील हॉटेल सी ग्रीनमध्ये 22 फेब्रुवारी 2021 रोजी पंख्याला लटकून मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली होती. त्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा हायकोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे. गुजराती भाषेत लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये ( delkar suicide note) राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि काही पोलीस अधिकाऱ्यांकडून सातत्याने मानसिक छळ होत असल्याचं लिहिलं होतं. याप्रकरणी काही व्यक्तींची नावंही त्या चिठ्ठीत लिहीली होती.
प्रफुल्ल खोडा पटेल, केंद्रशासित प्रदेश प्रशासक यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी संदीप सिंग, शरद दराडे, तत्कालीन पोलीस अधीक्षक अपूर्वा शर्मा, तत्कालीन उपजिल्हाधिकारी मनस्वी जैन, उपविभागीय अधिकारी मनोज पटेल, पोलिस निरीक्षक (सिल्वासा) रोहित यादव, राजकीय नेते फत्तेसिंग चौहान आणि दिलीप पटेल सिल्वासाचे तलाठी यांनी त्यांच्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला होता.
9 मार्च 2021 रोजी मुंबई पोलिसांनी डेलकर कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी एफआयआर नोंदवला. डेलकर यांचा मुलगा अभिनव याने आयपीसीच्या कलम 306 आत्महत्येला प्रवृत्त करणे, 506 गुन्हेगारी धमकी आणि 120 बी गुन्हेगारी कट तसेच एससी एसटी प्रिव्हेंशन ऑफ अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यांतर्गत तक्रार नोंदवली होती. एफआयआरमध्ये असा आरोप करण्यात आला होता की डेलकर गेल्या एक वर्षापासून दबावाखाली होते आणि डीएनएच प्रशासन त्यांचा सतत छळ करत होते आणि फायदा मिळवण्यासाठी त्यांच्याशी अनादर करत होते. एमपीच्या कॉलेजवर एसएसआर कॉलेज ऑफ फार्मसी अँड मॅनेजमेंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांना पुढील निवडणुका लढवण्यापासून रोखण्यासाठी कटकारस्थान करण्यात येत होते असे आरोप डेलकर यांच्या कुटुंबीयांनी केले होता.