ETV Bharat / city

Mumbai High Court : महिलेच्या बर्थजवळ लघवी करणाऱ्या टीसीला अटकेपासून संरक्षण, 25 हजारांचा ठोठावला दंड - महिलेच्या बर्थजवळ लघवी करणाऱ्या टीसीला अटकेपासून संरक्षण

तक्रारकर्ती प्रवासी महिला 7 मार्च रोजी निजामुद्दीन पुणे दुरंतो ट्रेनने प्रवास करत होती. ट्रेन पुण्याच्या दिशेने जात असताना महिलेच्या बर्थजवळ पाणी पडण्याचा आवाज आला. तेव्हा तिला बर्थजवळ एक व्यक्ती लघवी करताना दिसली. या प्रकारामुळे महिला घाबरली आणि तिने हेल्पलाइनवर कॉल केला. त्यानंतर झालेला प्रकार प्रवाशांच्या लक्षात आला.

Mumbai High Court
मुंबई उच्च न्यायालय
author img

By

Published : Jun 15, 2022, 1:57 PM IST

मुंबई - मद्यधुंद अवस्थेत महिलेच्या बर्थजवळ लघवी करणाऱ्या रेल्वे तिकीट कलेक्टरला अटकेपासून मुंबई उच्च न्यायालयाने संरक्षण दिले. एका प्रवासी महिलेसोबत असभ्य वर्तन केल्याबद्दल निलंबित टीसीला न्यायालयाने 25 हजारांचा दंड ठोठाला आहे. तो दंड ठाणे रेल्वे स्थानकावर वॉटर कुलरसाठी वापरण्याचे निर्देश मंगळवारी न्यायालयाने दिले आहे. मुनेश चंद मीना असे त्या गैरप्रकार करणाऱ्या टीसीचे नाव आहे.

बर्थजवळ लघवी करताना पकडला टीसी -तक्रारकर्त्या प्रवासी महिला 7 मार्च रोजी निजामुद्दीन पुणे दुरंतो ट्रेनने प्रवास करत होत्या. ट्रेन पुण्याच्या दिशेने जात असताना महिलेच्या बर्थजवळ पाणी पडण्याचा आवाज आला. तेव्हा तिला बर्थजवळ एक व्यक्ती लघवी करताना दिसली. या प्रकारामुळे महिला घाबरली आणि तिने हेल्पलाइनवर कॉल केला. तिच्यासह प्रवास करणाऱ्या सहप्रवाशांना घडलेला प्रकार लक्षात आला. सहप्रवाशांपैकी एकाने ही घटना आपल्या मोबाईलवर रेकॉर्ड केली. त्यामुळे टीसीने केलेल्या प्रकाराविषयी प्रवाशांना वस्तुस्थितीची माहिती समजली. आरोपी हा तिकीट तपासनीस असून मुनेश चंद मीना असे त्याचे नाव आहे. महिलेच्या तक्रारीवर कर्जत रेल्वे स्थानकावर मुनेशविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामीनासाठी मुनेशने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्या. भारती डांगेर यांच्यासमोर सुनावणी पार पडली.

केलेल्या कृत्याचा टीसीला पश्चात्ताप -आरोपीला आपण केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप होत असल्याचे मुनेशच्यावतीने अॅड. ए. ए. खान यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर अर्जदार मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसत असून छायाचित्र आणि व्हिडिओमध्ये आरोपी माफी मागताना दिसत आहे. आरोपीला आधीच निलंबित करण्यात आले आहे आणि त्याची विभागीय चौकशी सुरू आहे. त्यामुळे कोठडीत चौकशीची गरज नाही, असे न्यायमूर्ती डांगरे यांनी नमूद केले. मात्र रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांचे संरक्षण करणाऱ्या संरक्षकाने मद्यधुंद अवस्थेत महिलेच्या बर्थजवळ लघवी करण्याचे घृणास्पद वर्तन केले आहे. हे वर्तन अक्षम्य आहे, असेही न्या. डांगरेंनी नमूद केले आणि मीना यांना 25000 रुपयांचा दंड ठोठावला. सदर रक्कम ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुविधेसाठी उभारण्यात येणाऱ्या वॉटर कुलरसाठी वापरली जावी. तसेच मीना यांनी चार आठवड्यांत हे पैसे जमा करावेत, असेही आदेशात स्पष्ट करत न्यायालयाने आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.