ETV Bharat / city

अवैध बांधकाम प्रकरणी उच्च न्यायालयाने सोनू सूदची याचिका फेटाळली - सोनू सूद बातमी

मुंबई उच्च न्यायालयाने सोनू सूदची याचिका फेटाळली आहे. बॉलीवूड अभिनेता सोनू सूद विरोधात मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) पोलीस तक्रार केलेली आहे. जुहू येथील एक सहा मजली रहिवासी इमारत बीएमसीच्या परवानगीशिवाय एका हॉटेलमध्ये रुपांतरीत केल्याचा आरोप सोनू सूदवर आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jan 21, 2021, 11:24 AM IST

Updated : Jan 21, 2021, 11:42 AM IST

मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने बॉलीवूड अभिनेता सूदची याचिका फेटाळली आहे. जुहू येथील एक सहा मजली रहिवासी इमारतीत बीएमसीच्या परवानगीशिवाय एका हॉटेलमध्ये रुपांतरीत केल्याचा आरोप सोनूवर आहे. या प्रकरणी एमआरटीपी कायद्याअंतर्गत बीएमसीने तक्रार दाखल केली आहे. मात्र, आपण बेकायदेशीर बांधकाम केले नसून इमारतीवर कारवाई होऊ नये, अशी याचिका त्याने उच्च न्यायालयात केली होती. मात्र, ही याचिका फेटाळण्यात आली आहे.

न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर सुनावणी -

सोनू सूद याच्या जुहू परिसरातील शक्ती सागर या 6 मजली इमारतीमध्ये करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात मुंबई महापालिकेने कारवाई केल्यानंतर यासंदर्भात सोनू सूदने मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर याची सुनावणी झाली असता दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने या याचिकेवरील निकाल देत अभिनेता सोनू सूद याची याचिका फेटाळून लावली आहे.

मुंबई महानगर पालिकेचा युक्तीवाद -

अभिनेता सोनू सूद हा सवयीचा अपराधी म्हणजेच हॅबिच्युअल ऑफेंडर असल्याचे मुंबई महानगरपालिकेकडून आरोप करण्यात आलेला आहे. या आगोदर सोनू सूद ला 2018 मध्ये नोटीस पाठविण्यात आली होती. मात्र, हा वाद सत्र न्यायालयात गेल्यावर सत्र न्यायालयानेही सोनू सूदच्या विरोधात निकाल दिला असल्याचा दाखला मुंबई महानगर पालिकेने उच्च न्यायालयात दिला होता.

काय म्हणाला सोनू सूद

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांच्या मुंबईतील शक्ती सागर या मालकीच्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी पालिकेकडून कारवाई केल्यानंतर याबाबत मुंबई उच्च न्यायालयात सूदने याचिका दाखल केली होती. मुंबई महानगरपालिकेने माझ्यावर केलेली कारवाई ही भेदभावपूर्ण असून 1992 साली बांधण्यात आलेली शक्ती सागर ही सहा मजली इमारत मी 2018 मध्ये आहे त्या परिस्थितीत घेतली होती. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम केले नसल्याचा दावा सोनू सूदने बुधवारी (दि. 13 जाने.) झालेल्या सुनावणीत केला होता.

विना परवाना हॉटेल सुरू केल्याचा आरोप -

गरिबांचा मसिहा बनलेल्या सोनू सूद विरोधात बीएमसीने ४ जानेवारी रोजी जुहू पोलिसात तक्रार दाखल केली होती. जुहूच्या एबी नायर रस्त्यावर असलेल्या 'शक्ती सागर' या रहिवासी इमारतीत कोणत्याही परवानगीशिवाय हॉटेल सुरू केले आहे. सोनू सूद यांनी इमारतीचा काही भाग वाढवल्याचा, बदल केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी एमआरटीपी कायद्याअंतर्गत सोनू सूदविरोधात तक्रार केली आहे.

जुहू पोलीस ठाण्यात तक्रार -

याप्रकरणी गणेश कुसमुलु यांनी यापूर्वी बीएमसीमध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र, याबाबत कोणतीही कारवाई करण्यात न आल्याचे गणेश यांनी सांगितले होते. त्यानंतर आपण लोकायुक्तांकडे जाऊन याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर, दिंडोशी न्यायालयाने बीएमसीला याबाबत तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. ज्यानंतर बीएमसीने एमआरटीपीच्या अंतर्गत जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

अवैध बांधकाम केले नाही - सोनू सूद

दरम्यान, बीएमसीच्या सर्व आरोपांचे सोनू सूदने खंडन केले आहे. इमारतमधील बदलासाठी आपण बीएमसीकडून यूझर चेंजसाठी परवानगी घेतली आहे. आता फक्त महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून मंजूरी मिळणे बाकी आहे. त्यामुळे सध्या मी कामही थांबवलेले आहे, असे सोनू सूदने यांनी स्पष्ट केले आहे. मी अवैध बांधकाम केले नसून कारवाई टाळण्यासाठी सोनू सूदने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

लॉकडाऊनमध्ये केलेल्या कामाने मिळाली प्रसिद्धी -

सोनू सूद हा अभिनेता कोरोना लॉकडाऊन दरम्यान चर्चेत आला. उत्तर प्रदेशमधील कामगारांना गावी जाता यावे म्हणून त्यांनी वाहनांची सोय करून दिली होती. या कामगारांना रस्त्यात जेवणाची सोयही सोनूने केली होती. याशिवाय सोनूने अनेक लोकांना विविध कारणांसाठी मदत केली होती. त्यांनी केलेल्या कामांमुळे तेलंगणामध्ये त्यांचे मंदिरही बांधण्यात आले आहे.

Last Updated : Jan 21, 2021, 11:42 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.