ETV Bharat / city

उच्च न्यायालयाकडून गँगस्टर अरुण गवळीला दणका; जन्मठेप कायम - अरुण गवळी बातम्या

मकोका कायद्याखाली अटक करण्यात आलेल्या अरुण गवळीची जन्मठेपेची शिक्षा आज मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्याप्रकरणी गवळी तुरूंगात आहे.

bombay high court denied mercy petition of arun gawali
उच्च न्यायालयाकडून गँगस्टर अरुण गवळीला दणका
author img

By

Published : Dec 9, 2019, 2:01 PM IST

मुंबई - मकोका कायद्याखाली अटक करण्यात आलेल्या अरुण गवळीची जन्मठेपेची शिक्षा आज मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्याप्रकरणी गवळी तुरूंगात आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात अरुण गवळीच्या वकिलांकडून शिक्षेच्या विरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना गवळीसह 11 आरोपींची शिक्षा कायम ठेवल्याचे न्यायालयाने सांगितले.

उच्च न्यायालयाकडून गँगस्टर अरुण गवळीला दणका

27 ऑगस्ट 2007 रोजी कमलाकर जामसांडेकर या शिवसेना नगरसेवकावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यानंतर तपासादरम्यान अरुण गवळीसह 11 जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली.

आर्थिक व्यवहारावरुन संबंधित हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मकोका न्यायालयामध्ये यावर सुनावणी दरम्यान अरुण गवळीसह अकरा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आता उच्च न्यायालयाने या विरोधातील याचिका फेटाळून गवळी गँगला दणका दिला आहे.

काय आहे प्रकरण

2007 साली मार्च महिन्यात सेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची राहत्या घरी गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. संबंधित हत्या अशोक कुमार जैसवाल, नरेंद्र गिरी आणि विजय गिरी यांनी घडवून आणली.
नंतर अशोक कुमार जैसवालने गोळी झाडल्याचे तपासात समोर आले. या कामासाठी तिघांना अडीच लाख रुपये पुरवण्यात आल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली. तसेच अरुण गवळीच्या सांगण्यावरुनच हे हत्याकांड घडवून आणल्याचे त्यांनी कबूल केले. यासंदर्भात न्यायालयात पुरावे सादर केल्यानंतर गवळीला दोषी ठरवण्यात आले. सध्या अरुण गवळी नागपूर कारागृहात आहे.

Intro:शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्याप्रकरणी मकोका कायद्याखाली अटक करण्यात आलेल्या अरून गवळी याच्यासह 11 आरोपींच्या संदर्भात मकोका न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा आज मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवलेली आहे . मुंबई उच्च न्यायालयामध्ये यासंदर्भात अरुण गवळीच्या वकिलांकडून जन्मठेपेच्या शिक्षेच्या विरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. ज्यामध्ये कोर्टाने ही पुनर्विचार याचिका फेटाळून लावत अरुण गवळी याची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवलेली आहे.Body:27 ऑगस्ट 2007 रोजी कमलाकर जामसांडेकर या शिवसेना नगरसेवकाची त्याच्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या संदर्भात गुन्हे शाखेकडून तपास केला जात होता व मिळालेल्या पुराव्यानंतर अरुण गवळी सह 11 या प्रकरणी अटक करण्यात आली होती. पैशांच्या व्यवहारांवरून हि हत्या झाल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं. मकोका न्यायालयामध्ये यावर सुनावणी होत 2014 साली मकोका न्यायालयाकडून अरुण गवळी सह अकरा जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती. सध्या अरुण गवळी हा नागपूर कारागृहात आहे.Conclusion:काय आहे प्रकरण --
मार्च २००७ रोजी शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या राहत्या घरी त्यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. हि हत्या अशोक कुमार जैसवाल, त्याचे अन्य दोन साथी नरेंद्र गिरी आणि विजय गिरी यांनी घडवून आणली होती. कमलाकर जामसंडेकर यांच्यावर अशोक कुमार जैसवाल याने त्याच्याकडील रिव्हालवर ने गोळी झाडली होती. या कामासाठी या तिघांना अडीच लाख रुपये पुरविण्यात आले होते असा कबुली जवाब या आरोपींनी पोलिसांना दिला होता. अरुण गवळी याच्या सांगण्यावरूनच हे हत्याकांड घडवून आणण्यात आले होते आणि या बद्दलचे पुरावे न्यायालयात पोलिसांनी सादर केले होते, या सर्व पुराव्यांच्या आधारावर मोक्का न्यायालयाने अरुण गवळी याला दोषी ठरविले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.