मुंबई - मुंबई आणि ठाणे या दोन महत्वाच्या शहरांना जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) कडून मेट्रो 4 आणि 4 अ ची उभारणी केली जात आहे. वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो 4 आणि कासारवडवली ते गायमुख 4 अ या दोन्ही मेट्रो मार्गाचे काम वेगात सुरू असून आता लवकरच मेट्रो गाडीच्या बांधणी (निर्मिती) ला सुरुवात होणार आहे. कारण या गाड्यांच्या बांधणीसाठीचे कंत्राट लवकरच अंतिम होणार आहे. तर हे कंत्राट बॉम्बार्डीयर या कंपनीला जाण्याची शक्यता आहे. कारण निविदेनुसार या कंपनीकडून सर्वात कमी बोली लावण्यात आली आहे. तर दुसरी कंपनी चिनी असून ती निविदेसाठी अपात्र ठरली आहे. या पार्श्वभूमीवर आता बॉम्बार्डीयरला मेट्रो 4 आणि 4 अ च्या गाड्यांच्या बांधणीचे काम मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
35 किमीच्या मार्गात 34 स्थानके
वडाळा ते कासारवडवली असा मेट्रो 4 मार्ग एमएमआरडीएने हाती घेतला. तर पुढे याचा विस्तार कासारवडवली ते गायमुख असा करण्याचा निर्णय घेत मेट्रो 4 अ मार्ग अंतिम केला. त्यामुळे आता वडाळा ते गायमुख असा 35 किमीचा मार्ग बांधण्यात येत आहे. या मार्गात 34 स्थानके असणार असून या मार्गामुळे मुंबई आणि ठाण्यातील अंतर कमी होणार असून प्रवास सुकर होणार आहे. अशा या मार्गावरील मेट्रो गाडयाची निर्मिती करण्यासाठी एमएमआरडीएने निविदा मागवल्या होत्या. आता लवकरच निविदा अंतिम करत कंत्राट बहाल केले जाणार आहे.
'ही' चिनी कंपनी ठरली अपात्र
मेट्रो-मोनोसह एमएमआरडीएचे सर्व प्रकल्प हे अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे असतात. त्यामुळे या प्रकल्पाच्या कोणत्याही कामासाठी जागतिक स्तरावरच निविदा मागवल्या जातात. गेल्या वर्षी भारत आणि चीनमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर चिनी कंपन्यावर बहिष्कार टाकत आत्मनिर्भरतेचा नारा देण्यात आला. यात एमएमआरडीएही आघाडीवर होती. एमएमआरडीएने चिनी कंपन्यांवर बहिष्कार टाकत मेट्रो आणि मोनो गाड्याची बांधणी (निर्मिती) भारतातच करण्याचा निर्णय घेतला. याच निर्णयामुळे मेट्रो 4 आणि 4 अ च्या गाड्यांच्या बांधणीच्या निविदेसाठी ज्या चिनी कंपनीकडून निविदा दाखल झाली होती, ती चिनी कंपनी अपात्र, बाद ठरली आहे. बॉम्बार्डीयर आणि सीआरआरसी कॉर्पोरेशन लिमिटेड या दोन कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या. पण आता सीआरआरसी ही चिनी कंपनी बाद, अपात्र ठरली आहे.
बॉम्बार्डीयर वडोदरा येथे करणार मेट्रो गाड्याची बांधणी
चिनी कंपनी बाद ठरली असून बॉम्बार्डीयर कंपनी सर्वात कमी बोलणारी लावणारी कंपनी ठरली आहे. त्यामुळे आता याच कंपनीला मेट्रो गाड्याच्या बांधणीचे कंत्राट मिळण्याची शक्यता आहे. तर याला एमएमआरडीएतील वरिष्ठांनी ही दुजोरा दिला आहे. एमएमआरडीएच्या आत्मनिर्भर होण्याच्या निर्णयात ही बॉम्बार्डीयर कंपनी बसत आहे. कारण या कंपनीकडून गुजरात, वडोदरा येथे मेट्रो गाड्या तयार करण्यात येणार आहेत. तर बंगळुरू येथे मेट्रो गाड्यांचे डिझाइन तयार करण्यात येणार आहे. तेव्हा या कंपनीलाच हे कंत्राट मिळण्याची शक्यता दाट आहे.
मेट्रो 4 आणि 4 अ साठी मेट्रो गाड्यांची बांधणी करणार बॉम्बार्डीयर? - mumbai-thane route metro
मुंबई आणि ठाणे या दोन महत्वाच्या शहरांना जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) कडून मेट्रो 4 आणि 4 अ ची उभारणी केली जात आहे. वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो 4 आणि कासारवडवली ते गायमुख 4 अ या दोन्ही मेट्रो मार्गाचे काम वेगात सुरू असून आता लवकरच मेट्रो गाडीच्या बांधणी (निर्मिती) ला सुरुवात होणार आहे.