ETV Bharat / city

बॉलीवूड अभिनेता सलमान खानला बंदूक ठेवण्याची मुंबई पोलिसांकडून परवानगी - सलमान खान बंदूक परवानगी

बॉलीवूड अभिनेता सलमान खानला बंदूक ठेवण्याची मुंबई पोलिसांकडून परवानगी दिली आहे. सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्याकडे बंदूक ठेवण्याची परवानगी मागितली होती. सलमान आता त्याच्या सुरक्षेसाठी बंदूक ठेवू शकतो. यासंदर्भात सलमानने काही दिवसांपूर्वी मुंबईच्या आयुक्तांचीही भेट घेतली होती.

सलमान खान
सलमान खान
author img

By

Published : Aug 1, 2022, 9:16 AM IST

Updated : Aug 1, 2022, 10:34 AM IST

मुंबई- बॉलीवूड अभिनेता सलमान खानला बंदूक ठेवण्याची मुंबई पोलिसांकडून परवानगी दिली आहे. सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्याकडे बंदूक ठेवण्याची परवानगी मागितली होती. सलमान आता त्याच्या सुरक्षेसाठी बंदूक ठेवू शकतो. यासंदर्भात सलमानने काही दिवसांपूर्वी मुंबईच्या आयुक्तांचीही भेट घेतली होती.

अभिनेता सलमान खानला काही दिवसांपूर्वी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मॉर्निंग वॉक करताना सलमान खानचे वडील सलीम खान यांना बेंचवर पडलेलं एक पत्र सापडलं होते. यामध्ये त्यांना आणि त्यांचा मुलगा सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेनंतर सलमानने स्वसंरक्षणासाठी बंदूक परवान्यासाठी अर्ज केला होता. आता मुंबई पोलिसांनी त्याला परवानगी दिली आहे. सलमानने काही दिवसांपूर्वी बंदूक परवान्यासाठी अर्ज केला होता. या संदर्भात त्याने 22 जुलै रोजी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचीही भेट घेतली होती. नाव न सांगण्याच्या अटीवर आयपीएस अधिकाऱ्याने सांगितलं की सलमान खानच्या प्रतिनिधीने पोलिस मुख्यालयाशी संबंधित शाखेतून परवाना घेतला. त्या व्यक्तीची पावती घेतल्यानंतर त्याच्याकडे परवाना देण्यात आला आहे.

गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का याचीही पाहणी-सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतरच आम्ही अभिनेत्याला शस्त्र परवाना जारी केल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले. अधिकाऱ्याने पुढे सांगितलं की पुढील प्रक्रियेनुसार फाइल पडताळणीसाठी पोलिस आयुक्त कार्यालयाकडे झोन -9 पाठविण्यात आली होती. तसेच अभिनेत्याचा काही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का याचीही पाहणी करण्यात आली. सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर त्याची सुरक्षा 6 जूनपर्यंत वाढवण्यात आली होती. मॉर्निंग वॉक करत असताना सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळालं होतं. हे पत्र मिळाल्यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. त्याच्या घराबाहेर पोलिस व्हॅनही तैनात करण्यात आली होती.

संपत नेहरा याला सलमानच्या हत्येची सुपारी-सलमानला धमकीचं पत्र मिळाल्यानंतर दिल्लीतील तुरुंगात कैद असलेल्या लॉरेन्स बिश्नोईची दिल्ली पोलिसांनी चौकशी केली. मात्र, बिश्नोईने सलमानला धमकी दिल्याची बाब नाकारली होती. आपल्या नावे कुणीतरी हे धमकीचं पत्र दिल्याचे बिश्नोईने पोलीस चौकशीत सांगितलं. मात्र काही वर्षांपूर्वी सलमाने हरणाची शिकार केली होती. त्यामुळे त्याच्यावर नाराज झाल्याने आपण त्यावेळी आपला सहकारी संपत नेहरा याला सलमानच्या हत्येची सुपारी दिल्याची कबुली त्याने दिली. या कामासाठी 3 ते 4 लाख रुपयांची स्पेशल आरके स्प्रिंग रायफलची ऑर्डरही दिली होती. मात्र त्याआधीच त्याला अटक झाली होती.

सलमानच्या वडिलांना मिळाली होती धमकी- सलमान खान यांचे वडील सलीम खान ( Salim Khan ) मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर खानच्या गार्डला पत्र सापडले होते. सलमान खान लवकरच तू सिद्धू मूसवालासारखा होशील असे धमकीच्या पत्रात लिहिले होते. या प्रकरणी मुंबईच्या वांद्रे पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. पोलिसांनी भादंवि कलम 506 अन्वये गुन्हा दाखल केला होता. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर सलमानला धमकीचे पत्र मिळाल्यानंतर संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

शस्त्र परवान्याला सामाजिक संस्थेकडून विरोध - बॉलीवूड अभिनेता सलमान खानने परवानाधारक शस्त्रासाठी केलेल्या अर्जाला विरोध सुरू झाला आहे. मुंबईतील एका सामाजिक संस्थेने मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून परवाना न देण्याची मागणी केली आहे. नुकतेच बॉलिवूड अभिनेता सलमान खानने मुंबई पोलिसांच्या सीपींची भेट घेतली. सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमक्या मिळाल्यानंतर ही भेट झाली. परवानाधारक शस्त्रासाठी सलमान खानने अर्ज केला आहे. मुंबईतील ‘संघर्ष’ या सामाजिक संस्थेने याला विरोध केला. संघटनेचे अध्यक्ष पृथ्वीराज म्हशके यांनी सांगितले की, सलमान खानवर अनेक खटले असून तो आक्रमक मनाचा आहे. अशा स्थितीत त्यांना परवाना देणे योग्य नाही.

हेही वाचा-Salman Khan : मुंबई पोलिसांकडे सलमानचा शस्त्र परवान्यासाठी अर्ज; संघर्ष संघटनेने केला विरोध

Last Updated : Aug 1, 2022, 10:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.