चमोली: हे पर्यटक नववर्षाच्या आदल्या दिवशी गौरसन बुग्याल भागात फिरायला गेले होते. वन विभागाचे रेंज अधिकारी चेतना कंदपाल यांनी सांगितले की, गौरांना भेट देण्यासाठी गेलेल्या एका पर्यटकाने औली येथे येऊन बर्फात पडलेल्या मृतदेहांची माहिती स्थानिकांना दिली. तेव्हा वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यावर बर्फाचा थर साचला होता. त्यांच्या जवळ मिळालेल्या विमानाच्या तिकिटा वरुन ते पश्चिम मुंबईचे रहिवासी आहेत. त्या तिकिटावर संजीव कुमार गुप्ता आणि सिन्सा गुप्ता अशी नावे आहेत. पोलिस अधिक्षक श्वेता चौबे यांनी सांगितले की, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत
Mumbai tourists found buried: मुंबईच्या दोन पर्यटकांचे मृतदेह औली येथे बर्फात सापडले - found buried in snow
उत्तराखंड मधे औलीपासून चार किलोमीटरवर असलेल्या गौरसन बुग्याल येथे मुंबईच्या दोन पर्यटकांचे मृतदेह (Bodies of two Mumbai tourists) बर्फात गाडलेल्या अवस्थेत सापडले (found buried in snow) आहेत. तेथील पोलीस, एसडीआरएफ आणि वन विभागाच्या पथकांनी घटनास्थळावरुन मृतदेह जोशी मठ येथे आणले आहेत. त्यांच्या विमानाच्या तिकिटावरून (From a plane ticket) ते मुंबईचे रहिवासी असल्याचे समोर आले आहे.