मुंबई - तब्बल शंभर कोटींचा वाहन कर्ज घोटाळा करणाऱ्या दिलीप धाब्रियाला मुंबई पोलिसांच्या CIU पथकाने अटक केली होती. या संदर्भात आता आणखीन पुढे जात CIU कडून बीएमडब्ल्यू फायनान्सची चौकशी होणार असल्याचे समोर आले आहे.
रोहित अरोरा फरार -
बीएमडब्ल्यू फायनान्सच्या कंपलायन्स या पदावर रोहित अरोरा हा काही वर्ष काम करत होता. मात्र, सध्या रोहित अरोरा हा फरार असून तो दिल्लीत राहत असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली असता त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक दिल्लीला सुद्धा गेलो होते. मात्र, त्या ठिकाणी रोहित अरोरा हा आढळून आलेला नाही. या अगोदर CIU कडून रोहित अरोराला तीन वेळा चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले आहे. रोहित अरोरा याचा यापूर्वीच अटक पूर्व जामीन मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
बीएमडब्ल्यूच्या जर्मन अधिकाऱ्यांची होणार चौकशी -
दिलीप छाब्रिया यांच्या 41 कार पैकी 25 कारचे रजिस्ट्रेशन करण्यात आलेले नव्हते. मात्र , बीएमडब्ल्यू फायनान्स कंपनीने 41 गाड्यांना तब्बल 58 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केले असल्याचेही सीआययुच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आतापर्यंत पोलिसांकडून या प्रकरणी बी एम डब्ल्यू फायनान्स कंपनीच्या चार अधिकाऱ्यांची चौकशी झालेली असून यामध्ये एक आरोपी फरार आहे. दोन बीएमडब्ल्यू फायनान्स अधिकाऱ्यांना चौकशीसाठी समन्स पाठवलेले आहे.
याबरोबरच बीएमडब्ल्यूच्या दोन जर्मन नागरिकांना देखील मुंबई पोलिसांकडून समन्स पाठवण्यात आलेले असून हे दोन्ही जर्मन नागरिक बीएमडब्ल्यू फायनान्स संबंधित असल्याचे समोर आले आहे. बीएमडब्ल्यूच्या देगरी कार्डे व स्टीफन शिलफ्ट दोन अधिकाऱ्यांची चौकशी मुंबई पोलिसांकडून होणार आहे.
आतापर्यंत मुंबई पोलिसांकडून कॅथरीन फ्रान्स वॉशर ( सीईओ) कार्स टेन पीटर स्टंप (सीएफओ) प्रशांत कपूर ( सीओओ) व सचिन महाजन या बीएमडब्ल्यू फायनान्सच्या अधिकार्यांची चौकशी करण्यात आलेली आहे.