मुंबई : पूर्व उपनगरातील पवई, घाटकोपर, चांदिवली परिसरातील नागरिकांना केईम, सायन, राजावाडी आदी रुग्णालयात धाव घ्यावी (BMC Will Set Up hospital) लागते. यामुळे रुग्णालयांवरील भार कमी करण्यासाठी कुर्ला चांदिवली संघर्षनगर येथे पालिका ४७२ कोटी रुपये खर्च करून २९० बेडचे १२ मजली रुग्णालय उभारणार (hospital in Kurla Chandivali at cost of 472 crores) आहे.
१२ मजली रुग्णालय - वाढती लोकसंख्या रुग्णालयांवर पडणारा ताण लक्षात घेता मुंबई महापालिकेने नवीन रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्व उपनगरात अद्यावत रुग्णालय बांधण्यासाठी चांदिवली संघर्ष नगरमधील सीटीएस क्रमांक ११ ए-४ वर जनरल रुग्णालय बांधण्यात येणार आहे. १२ मजली रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे, माॅड्यूलर ऑपरेशन, स्टाफ क्वार्टर, रुग्णांसाठी सोयीसुविधा असणार आहेत. रुग्णालयीन स्टाफसाठी ३ विंग बांधण्यात येणार आहे. एक विंग १५ मजली, बि विंग - १९ व सी विंग १७ मजली असेल असे अधिकाऱ्याने सांगितले. या कामासाठी निविदा मागवल्या असून पात्र कंत्राटदारास वर्क ऑर्डर दिल्यानंतर पुढील तीन वर्षांत काम पूर्ण अपेक्षित आहे. इमारत बांधून रुग्णांच्या सेवेत आल्यापासून पुढील ८ वर्षें रुग्णालय इमारत व स्टाफ क्वार्टर इमारतीची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असणार (290 bed hospital in Kurla Chandivali) आहे.
मोठ्या रुग्णालयावरील ताण कमी - नायर, केईएम, सायन ही मुंबई महापालिकेची प्रमुख रुग्णालये आहेत. या रुग्णालयात रोज हजारो रुग्ण तपासणीसाठी येतात. या कारणाने रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. चांदिवली संघर्ष नगर येथे अद्ययावत १२ मजली रुग्णालय उभारण्यात येत आहे. पुढील तीन वर्षांत हे रुग्णालय रुग्णांच्या सेवेसाठी सुरू केले जाईल. यामुळे केईएम, नायर व सायन रुग्णालयावरील ताण कमी होईल, असा विश्वास आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने व्यक्त (hospital in Kurla Chandivali) केला.
असे होणार बांधकाम - १२ मजली रुग्णालय, ४७२ कोटींचा खर्च, आरसीसी बांधकाम, स्टाफ क्वार्टरच्या तीन विंग. डिसेंबर २०२५ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. इमारत देखभालीची जबाबदारी कंत्राटदाराची असणार आहे.