ETV Bharat / city

मुंबईतील पश्चिम उपनगरात महापालिका बांधणार ६ पूल - बीएमसी मुंबईत उभारणार नवे ६ पूल

मुंबईत नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या असते. ही वाहतूक कोंडी फुटावी म्हणून पालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पश्चिम उपनगरात सहा पूल बांधण्यात येणार आहेत.

BMC will build 6 bridges in the western suburbs of Mumbai
मुंबईतील पश्चिम उपनगरात महापालिका बांधणार ६ पूल
author img

By

Published : Mar 8, 2021, 6:41 PM IST

मुंबई - जागतिक दर्जाचे शहर असलेल्या मुंबईत नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या असते. ही वाहतूक कोंडी फुटावी म्हणून पालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पश्चिम उपनगरात सहा पूल बांधण्यात येणार आहेत. या पुलांच्या बांधकामाआधी पर्यावरणाचा अभ्यास, महाराष्ट्र कोस्टल रोड झोन मॅनेजमेंट ऑथाॅरिटी, वन मंत्रालय आदी विभागांची परवानगी घेणे गरजेचे आहे. या कामासाठी में. टंडन अबॅन सोल्यूशन्स प्रा. लि. कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विविध यंत्रणांची परवानगी प्राप्त झाल्यानंतर आणि सल्लागाराच्या सल्ल्यानंतर या सहा पुलांच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती पालिकेच्या पूल विभागातील अधिकाऱ्याने दिली.

या ठिकाणी उभारले जाणार सहा पूल -
शहर व उपनगरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत असून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नवीन पूल बांधण्याचे काम मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सुरु आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडीची समस्या लवकरच दूर होणार आहे. वर्सोवा खाडी, मार्वे मनोरी, ओशिवरा नदी इन्फिनाटी माॅल, मार्वे रोड, मालाड खाडी, मालवणी रामचंद्र नाल्यावरील पूल असे ६ पूल नव्याने बांधण्यात येणार आहेत. परंतु हे सगळे पूल समुद्र किनारी असून या कामासाठी पर्यावरण विभाग, वन मंत्रालय, सागरी मंडळ, महाराष्ट्र कोस्टल रोड झोन मॅनेजमेंट ऑथाॅरिटीसह अन्य यंत्रणांची मंजुरी घेणे बंधनकारक आहे. या कामासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. में. टंडन अबॅन सोल्यूशन्स प्रा.लि. कंपनीने याआधीही मुंबई महापालिकेच्या इमारत परिक्षण विभागात सल्लागार समितीवर काम केले आहे. त्यामुळे या सल्लागाराचे काम समाधानकारक असून या पुलांच्या कामाआधी पर्यावरणाचा अभ्यास करणे, विविध यंत्रणांची मंजुरी मिळवणे हे काम सल्लगारामार्फत करण्यात येणार आहे. यासाठी १ कोटी ८० लाख रुपये मोजणार आहे.

या पुलांची कामे होणार

मढ - वर्सोवा खाडी पूल, मार्वे मनोरी पूल, मालाड खाडी पूल व ओशिवरा नदी ओलांडणारा पूल, एव्हरशाईन नगर येथील रामचंद्र नाल्यावरील पूल, लगून रोड ते इन्फिनिटी माॅल जोडणारा पूल, धारीवली गाव मार्वे रोड येथील पूल

या विभागांची मंजुरी बंधनकारक -
पर्यावरण अभ्यास व पर्यावरण व वन मंत्रालयाची मंजुरी मिळवणे, भारतीय सागरी मंडळ, व संलग्न मंडळांची मंजुरी, महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट एथाॅरिटी व संलग्न विभागांची मंजुरी, संरक्षण विभाग व संलग्न विभागांची मंजुरी, न्यायालयाची मंजुरी

हेही वाचा - आता घर खरेदी करणाऱ्या महिला ग्राहकांचा टक्का वाढणार; बांधकाम क्षेत्राकडून निर्णयाचे स्वागत

हेही वाचा - घोषणांवर भाजपची मक्तेदारी आहे का? आम्ही साधूसंत नाही; अजित पवारांचा निशाणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.