ETV Bharat / city

मुंबई पालिकेच्या ऑक्सिजनबाबत 'या' उपाययोजनांची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल - bmc on oxygen

पालिका प्रशासनाने ऑक्सिजन पुरवठ्याबाबत उपाययोजना केल्या आहेत. तसेच मुंबईत १२ रुग्णालयात हवेपासून ऑक्सिजन बनवण्याचे प्लान्ट उभारले जात आहेत.

oxygen
ऑक्सिजन
author img

By

Published : May 7, 2021, 5:24 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार फेब्रुवारीपासुन पुन्हा वाढल्याने रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली. रुग्णसंख्या वाढत असताना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू लागला. ऑक्सिजनचा तुटवड्यामुळे मागील महिन्यात 168 रुग्णांना इतर रुग्णालयात हलवावे लागले. यापासून धडा घेत पालिका प्रशासनाने ऑक्सिजन पुरवठ्याबाबत उपाययोजना केल्या आहेत. तसेच मुंबईत १२ रुग्णालयात हवेपासून ऑक्सिजन बनवण्याचे प्लान्ट उभारले जात आहेत. यामुळे येत्या काही दिवसात मुंबई महापालिका ऑक्सिजन निर्मितीत आत्मनिर्भर त्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. यामुळे पालिकेने केलेल्या कामाची देशभरात दखल घेतली जात आहे.

प्रतिनिधी अजयकुमार जाथव यांनी घेतलेला आढावा

ऑक्सिजनची कमतरता -

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार सुरू झाला. हा प्रसार काही प्रमाणात कमी होत असतानाच फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आली. झपाट्याने रुग्णसंख्या वाढू लागली. दिवसाला 7 ते 11 हजार रुग्ण दिवसाला आढळून येऊ लागले. रुग्णांना ऑक्सिजन खाटा, आयसीयू आणि व्हेंटिलेटर कमी पडू लागले. त्यातच ऑक्सिजनचा पुरवठा वेळेवर न झाल्याने मागील महिन्यात एकाच दिवसात 168 रुग्णांना पालिकेच्या रुग्णालयातून इतर रुग्णालयात हलवावे लागले. हिंदू महासभा रुग्णालयातही ऑक्सिजन कमी असताना शेवटच्या क्षणी ऑक्सिजनचा पुरवठा करून रुग्णांना दिलासा देण्यात आला.

लिक्विड ऑक्सिजन टॅंक -

रुग्णांना ऑक्सिजनाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात लागू लागला. दिवसाला 235 मॅट्रिक टन ऑक्सिजनची गरज मुंबईला दिवसाला लागू लागली. ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू नये म्हणून पालिकेने मागीलवर्षीच ड्युरा सिलेंडर ऐवजी अनेक रुग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये लिक्विड ऑक्सिजन टॅंक बसवल्या आहेत. यामुळे रुग्ण जास्त प्रमाणात नसल्यास एका टाकीमधून 4 दिवस ऑक्सिजनचा पुरवठा होतो. तर रुग्णसंख्या जास्त असल्यावर दोन दिवसातून एकदा टाकी भरावी लागते. यासाठी पालिकेने दोन कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. एकाकडे तुटवडा असला तरी दुसऱ्याकडून ऑक्सिजनचा पुरवठा होत असल्याने मुंबईत म्हणावा तसा ऑक्सिजनचा तुटवडा जाणवलेला नाही.

हेही वाचा - आत्ता मुंबई पालिका खासगी हॉस्पिटलला ऑक्सिजनचा करणार पुरवठा

6 नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती -

ऑक्सिजनची कमतरता पडू नये. ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी ऑक्सिजन वेळेवर पोहचवा म्हणून पालिकेने 6 नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मुंबईमधील सर्व रूग्णालयांचा डेटा गुगल शीटवर नोंद करण्यात आला आहे. यामुळे कुठे कधी ऑक्सिजन पुरवठा केला आणि त्यांना नवीन साठा कधी लागेल याची माहिती आधीच मिळत आहे. ज्या रुग्णालयांना ऑक्सिजन लागेल त्यांनी त्यांच्या पुरवठादारांना 24 तास आधी कळवावे. पुरवठादाराने ऑक्सिजन पुरवठा न केल्यास 16 तास आधी पालिकेला कळवावे. पालिका त्या रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठा करेल. प्रशासकीय यंत्रणेसह ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादार यांनी देखील ‘मिशन मोड’ वर काम करावे, महानगरपालिकेने नेमलेल्या समन्वय अधिकाऱयांसमवेत मिळून सर्व विभागातील रुग्णालयांना वेळेवर प्राणवायू साठा पुरवावा. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणताही अनुचित प्रसंग ओढवणार नाही, याची दक्षता घेणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे निर्देश पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिले आहेत.

१२ ठिकाणी नवे ऑक्सिजन प्लांट -

ऑक्सिजनची निर्माण झालेली त्रुटी भरून काढण्यासाठी ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यासाठी मुंबईतील १२ ठिकाणांची निवड झाली असून त्यात प्रामुख्याने करोना जंबो सेंटरसह रुग्णालयांचाही समावेश आहे. पुढील एका महिन्यात सर्वच्या सर्व १२ केंद्रात ऑक्सिजन प्रकल्प तयार होऊन ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होणार आहे. एका जंबो सेंटर वा रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प तयार झाल्यावर तिथे एका तासात २ ते ५ हजार क्युबिक मीटर ऑक्सिजन उपलब्ध होईल. त्यातून एकाचवेळी २५ ते ३० रुग्णांना त्याचा पुरवठा करता होणार आहे. इतर ठिकाणीही अशाच पद्धतीने प्रकल्प तयार झाले की तिथल्या रुग्णालयांना ऑक्सिजन सुरळीत मिळण्यात अडचणी येणार नाहीत. सध्या ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्रकल्पसाठी सुमारे अडीच कोटी रुपये इतका खर्च आला होता. पालिकेने सध्या १२ जंबो कोरोना केंद्र, रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. महिनाभरात हे प्रकल्प पूर्ण होतील अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.

हेही वाचा - १८ वर्षांखालील मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘पेडीयाट्रीक टास्क फोर्स’ची निर्मिती - टोपे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.