ETV Bharat / city

नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर आता सीसीटीव्हीची नजर, दंडात्मक कारवाईचा पालिकेचा विचार - umping garbage in drains

महानगरपालिका सातत्याने प्रयत्न करत असते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून महापालिका क्षेत्रातील पर्जन्य जलवाहिन्या, नाले व नद्या इत्यादींची नियमितपणे साफ सफाई केली जाते. पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांमध्ये अनेक ठिकाणी प्लास्टिक, वस्तू, कचरा इत्यादी टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास येत असून यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा होतो.

कचरा टाकणाऱ्यांवर आता सीसीटीव्हीची नजर,
कचरा टाकणाऱ्यांवर आता सीसीटीव्हीची नजर,
author img

By

Published : Jun 13, 2021, 12:03 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये ६८९ किलोमीटर लांबीचे नाले आहेत. या नाल्यांवर अनेक ठिकणी झोपडपट्ट्या आहेत. त्यामधून नाल्यात कचरा टाकला जातो. यासाठी नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्या लोकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. तसेच सांगूनही कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी नाल्यांवर सीसीटीव्ही लावण्याचा विचार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

यांनी दिले होते निर्देश -
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पावसाचे पाणी वाहून जावे, महानगरपालिका सातत्याने प्रयत्न करत असते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून महापालिका क्षेत्रातील पर्जन्य जलवाहिन्या, नाले व नद्या इत्यादींची नियमितपणे साफ सफाई केली जाते. पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांमध्ये अनेक ठिकाणी प्लास्टिक, वस्तू, कचरा इत्यादी टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास येत असून यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा होतो. परिणामी पाणी तुंबल्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होतो. ही बाब लक्षात घेऊन मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर, सभागृहनेता विशाखा राऊत आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी या अनुषंगाने विविध स्तरीय जनजागृती करण्यासह अधिक प्रभावी दंडात्मक कारवाई करण्याचे व सीसीटिव्ही द्वारे देखील निगराणी करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनास दिले होते.

दंडात्मक कारवाई -

महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी याबाबत कार्यवाही सुरू करण्याचे आदेश महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या खात्याला दिले आहेत. या आदेशांनुसार आता मनपा प्रशासनाने याबाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर अधिक कडक कारवाई करण्याचे सूतोवाचही केले आहे. प्लास्टिकच्या पिशव्या, वस्तू, कचरा इत्यादी नाल्यांमध्ये टाकणा-या व्यक्तीवर पालिकेच्या नियमानुसार २०० रुपये इतकी दंड आकारणी अधिक प्रभावीपणे केली जाणार आहे. त्याचबरोबर सीसीटीव्हीद्वारे देखील नियमितपणे अवलोकन करून कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची बाबदेखील प्रशासनाच्या विचाराधीन आहे, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली आहे.

सीसीटीव्हीद्वारे निगराणी -

नाले साफ केल्यानंतरही त्यात कचरा टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे नाल्यात पाणी तुंबण्याची शक्यता वाढते. विशेष करून प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे पाणी तुंबण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या बाबींना प्रतिबंध होण्यासह संबंधितांच्या वर्तणुकीत सकारात्मक बदल व्हावा, या उद्देशाने आता जनजागृती कार्यक्रम हाती घेण्याचा महापालिका प्रशासनाचा मानस आहे. त्याचबरोबर सीसीटीव्हीद्वारे निगराणी करण्यासह दंडात्मक कारवाई अधिक प्रभावीपणे करण्याची बाब महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

मुंबईत इतके नाले -
महानगरपालिका क्षेत्रातील मोठे नाले, छोटे नाले व मिठी नदी यांची एकूण सुमारे ६८९ किलोमीटर आहे. यापैकी मोठ्या नाल्यांची लांबी ही सुमारे २४८ किलोमीटर इतकी आहे. तर छोट्या नाल्यांची लांबी ही सुमारे ४२१ किलोमीटर आहे. याव्यतिरिक्त उर्वरित २० किलोमीटर एवढी लांबी मिठी नदीची आहे, अशीही माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या खात्याद्वारे देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.