ETV Bharat / city

BMC On Rane Residence : राणेंच्या निवासस्थानावरुन BMC चे पथक परतले; नेमकी कारवाई काय ते गुलदस्त्यात - BMC On Narayan Rane's residence

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू येथील अधिश बंगल्यावर आज बृहन्मुंबई महानगर पालिकेकडून कारवाई केली जाण्याची शक्यता होती. या आधी बंगल्याचे पाहणी करण्यासंदर्भात पालिकेकडून राणे यांना नोटीस पाठवण्यात आली होती. (BMC Anti-encroachment squad) त्यानंतर आता पालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाचे पथक आज सकाळी नारायण राणे यांच्या बंगल्यावर दाखल झाले. त्यानंतर दुपारी हे पथक बंगल्यातून बाहेर पडले. मात्र आत नेमके काय झाले ते समजू शकले नाही.

नारायण राणेंच्या निवासस्थानी मनपाचे पथक रवाना;पोलीस बंदोबस्त तैनात

author img

By

Published : Feb 21, 2022, 10:44 AM IST

Updated : Feb 21, 2022, 1:51 PM IST

मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील निवासस्थानी महानगरपालिका कर्मचारी अनधिकृत घराची पाहणी करण्यासाठी आले. या पथकामध्ये पालिकेचे आठ अधिकारी आहेत. यावेळी हे अधिकारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी चर्चाही करणार आहेत. काही अनियमितता आढळल्यास कारवाईबाबत निर्णय होणार अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त येथे तैनात करण्यात आला आहे. दुपारी हे पथक बाहेर पडले मात्र आत काय झाले ते समजू शकले नाही.

संबंधित कागदपत्रांची तपासणी

माहिती अधिकार कार्यकर्त्यांने अनधिकृत बांधकामप्रकरणी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन मुंबई महापालिकेच्या पथकाने शुक्रवारी (दि. 18 फेब्रुवारी)रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याची तपासणी केली. तसेच पथकाने बंगल्यातील बांधकामांचे मोजमाप घेऊन संबंधित कागदपत्रांची तपासणीही केल्याची माहिती समोर आली होती.

परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना विरुद्ध नारायण राणे असा संघर्ष सुरू आहे. परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरल्याबद्दल नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर उभयतांमधील वाद आणखी चिघळला आहे. आता शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने राणे यांच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकाम प्रकरणी नोटीस बजावली. त्यावरूनही चांगलेच राजकारण तापले आहे.

राणेंच्या बंगल्याला पालिकेची नोटीस -

मुंबई महापालिकेच्या के-पश्चिम वॉर्ड (अंधेरी पश्चिम) च्या पदसिद्ध अधिकाऱ्याने स्वाक्षरी केलेली एक नोटीस गुरुवारी मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 च्या कलम 488 अन्वये मालक कब्जेदाराला म्हणजेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जारी करण्यात आली, ज्यात कळविण्यात आले की के -पश्चिम प्रभाग आणि इमारत प्रस्ताव विभागाचे पथक 18/02/22 रोजी किंवा त्यानंतर कोणत्याही वेळी कर्मचार्‍यांसह आवारात किंवा CTS क्रमांक 997 आणि 997-A मध्ये प्रवेश करीन. त्यावेळी मोजमाप व छायाचित्रे घेण्यासाठी उक्त परिसराची पाहणी करेल. त्यावेळी बंगल्याचे बांधकामावेळचे मंजूर करण्यात आलेले प्लान, बंगल्याच्या बांधकामाबाबतची कागदपत्रे तयार ठेवण्यात यावीत अशी नोटीस बजावण्यात आली आहे.

तर बांधकाम तोडले जाऊ शकते -

पालिकेने दिलेल्या नोटीसीनुसार पथक जाऊन बंगल्याची आणि परिसराची पाहणी करेल. प्रत्येक बांधकामाचे मोजमाप घेतले जाईल. ज्यासाठी बांधकामाची मंजुरी दिली आहे का तेच बांधकाम केले आहे का हे सुद्धा तपासले जाईल. बंगला उभारताना दिलेल्या मंजुरी नुसार बांधकाम केले नसल्यास किंवा त्यात काही बदल केले असल्यास ते बांधकाम पालिकेकडून तोडले जाऊ शकते. अशीच कारवाई याआधी सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत हिच्या घरावरही झाली होती.

हेही वाचा - Sanjay Raut On BJP : चंद्रकांत पाटलांनी भाजप सांभाळावा आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही -राऊत

Last Updated : Feb 21, 2022, 1:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.