ETV Bharat / city

BMC Budget Speech : 'दुश्मनी करो, तो जमके करो, लेकींन...'; शायरीतून स्थायी समिती अध्यक्षांचा भाजपाला टोला

भाजपाकडून पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर टीका व आरोप केले जात आहेत. यावर 'दुश्मनी करो, तो जमके करो, पर ये खयाल रहे के कल अगर दोस्त भी बने तो शर्मिंदगी न हो', अशी शायरी अर्थसंकल्पीय भाषणात ( BMC Budget Speech ) करत स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव ( Yashwant Jadhav shayari ) यांनी विरोधकांना चांगलेच फटकारले.

Yashwant Jadhav shayari
Yashwant Jadhav shayari
author img

By

Published : Feb 12, 2022, 1:56 AM IST

मुंबई - मुंबई महापालिकेची निवडणूक ( BMC Election 2022 ) होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर टीका व आरोप केले जात आहेत. यावर 'दुश्मनी करो, तो जमके करो, पर ये खयाल रहे के कल अगर दोस्त भी बने तो शर्मिंदगी न हो', अशी शेरोशायरी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात ( BMC Budget Speech ) करत स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव ( Yashwant Jadhav ) यांनी विरोधकांना चांगलेच फटकारले. तसेच २०१७च्या निवडणुकीपूर्वी दिलेली वचने पूर्ण केल्याचे जाधव म्हणाले.

भाजपला फटकारले -

मुंबई महापालिकेच्या सन २०२२-२३च्या अर्थसंकल्पावर शुक्रवारी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आपले प्रास्ताविक भाषण केले. यावेळी बोलताना, मुंबई जगात पुढे असावी, यासाठी शिवसेना नेहमीच प्रयत्नशील असते, पुढेही राहील. मात्र, काही राजकीय पक्षांचे मित्र खोटे आरोप करून दिशाभूल करीत आहेत. माहिती न घेता टीका केली जाते, असे म्हणत 'दुश्मनी करो, तो जमके करो, पर ये खयाल रहे के कल अगर दोस्त भी बने तो शर्मिंदगी न हो', अशी शेरोशायरी करत भाजपाला फटकारले. चांगले काम करूनही विरोधक कधीच शाबासकी देत नाहीत. अनेकवेळा विरोधच केला जातो. त्यामुळे यांच्यासाठीच आपण भाषणा दरम्यान शेरोशायरीतून उत्तर देण्याचा प्रयत्न केला, असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

नगरसेवकांना आयुक्त भेटत नाहीत -

मुंबई महापालिकेला जकातीच्या नुकसान भरपाईपोटी राज्य सरकारने ११ हजार ४२९ कोटी ७३ लाख रुपये दिल्याचे स्पष्ट केले. हे अनुदान पालिकेला यापुढेही मिळणार का, याबाबत पालिका आयुक्तांनी अर्थसंकल्पात खुलासा का केला नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आयुक्त नगरसेवकांना भेटत नाहीत, त्यांना बसवून ठेवले जाते. आयुक्तांसोबत विकासाच्या कामांबाबत नगरसेवकांना चर्चा करायची असते. मात्र, भेट दिली जात नसल्याने सर्वसामान्य नगरसेवकांच्या प्रभागातील कामे होत नाहीत. नगरसेवक आयुक्तांच्या विरोधात बोलले तर, त्यांची कामे थांबवली जातात, असेही ते म्हणाले.

वचन पूर्ण, वांद्रेत डबेवाला भवन -

मागील अर्थसंकल्पात डबेवाला भवन उभारण्याबाबत तरतूद होती. शिवसेनेनेही डबेवाला भवन उभारले जाईल, असे आश्वासन दिले होते. यंदाचा अर्थसंकल्प मांडताना विरोधकांनी यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. दरम्यान, डबेवाला भवन उभारण्याबाबत आता सकारात्मक पावले उचलण्यात आली आहे. डबेवाल्यांसाठी वांद्रे येथे २८६.२७ चौरस मीटर जागेत डबेवाला भवन बांधून देणार असल्याचे जाधव यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. २०१७च्या निवडणुकीत दिलेली वचने आम्ही पूर्ण केली आहे, असेही जाधव यांनी सांगितले. अर्थसंकल्पात घोषित केलेली विकासकामे दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.

हेही वाचा - BJP MLAs Suspension : विधिमंडळ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांचा घटनात्मक पेच निर्माण होऊ नये म्हणून राष्ट्रपतींना निवेदन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.