ETV Bharat / city

तिसऱ्या लाटेसाठी महापालिका सज्ज, लहान मुलांसाठी स्वतंत्र विभाग - corona in mumbai

प्रत्येक रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालयांसह जम्‍बो सेंटर्समध्‍ये लहान मुलांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिका सज्ज असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. लहान मुलांची नागरिकांनी विशेष काळजी घ्‍यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने काकाणी यांनी केले आहे.

रुग्णालय, कोविड सेंटरची पाहणी
रुग्णालय, कोविड सेंटरची पाहणी
author img

By

Published : Jun 24, 2021, 3:37 PM IST

मुंबई - कोरोना विषाणू संसर्गाच्‍या संभाव्‍य तिसऱ्या लाटेचा सामना करण्‍यासाठी जम्बो कोविड सेंटर्ससह सर्व कोरोना काळजी केंद्रांमधील बेड सुसज्ज ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालयांसह जम्‍बो सेंटर्समध्‍ये लहान मुलांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिका सज्ज असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. लहान मुलांची नागरिकांनी विशेष काळजी घ्‍यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने काकाणी यांनी केले आहे.

सूचनांचे पालन करा -

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मालाडमध्‍ये मुंबई विकास प्राधिकरणामार्फत नव्याने उभारण्यात येत असलेले कोविड केअर सेंटर, गोरेगाव जम्बो कोविड सेंटर, बी. के. सी. जम्बो कोविड सेंटर, दहिसर जम्बो कोविड सेंटर, कांजूरमार्ग कोविड सेंटर येथे भेट दिली. यावेळी बोलताना, मुंबई महानगरामध्‍ये कोविड-१९ विषाणू संसर्गाची पहिली व दुसरी लाट योग्‍यपणे थोपवून मुंबईकरांना सर्वोत्‍तम आरोग्‍य सुविधा देणाऱया महानगरपालिकेने कोविड-१९ च्‍या संभाव्‍य तिसऱया लाटेचा सामना करण्‍यासाठी तयारी केली आहे. अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी दोन दिवस रुग्णालय आणि कोविड सेंटरचे पाहणी दौरे करुन या तयारीचा संपूर्ण आढावा घेतला आहे. महापालिका प्रशासन सुसज्‍ज होत असली तरी कोविड संसर्गाची तिसरी लाट येवू नये, यासाठी मुंबईकरांनी कोविड प्रतिबंधक सर्व सुचनांचे व मार्गदर्शक तत्‍वांचे पालन करावे, विशेषतः लहान मुलांची अधिक काळजी घ्‍यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्‍यावतीने करण्‍यात येत आहे.

रुग्णालय, कोविड सेंटरची पाहणी -

कोविड विषाणूच्‍या संभाव्‍य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाने, विशेषतः आरोग्‍य यंत्रणेने कामकाजाचा फेरआढावा घेवून पूर्वतयारी सुरू केली असून सदर कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्‍याची प्रत्‍यक्ष पाहणी करुन आढावा घेण्‍यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी दोन दिवस महानगरपालिकेची विविध रुग्‍णालये तसेच जम्‍बो कोविड सेंटर्स ची देखील पाहणी केली. या तयारीबद्दल समाधान व्‍यक्‍त करतानाच ऊर्वरित कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करुन सतर्क राहण्‍याचे निर्देशही आरोग्‍य यंत्रणेला त्‍यांनी दिले.

रुग्णालय, कोविड सेंटरची पाहणी
रुग्णालय, कोविड सेंटरची पाहणी

महापालिका यंत्रणा सुसज्ज -

या आढाव्‍याबाबत माहिती देताना काकाणी म्‍हणाले की, महानगरपालिकेची विविध रुग्‍णालये, जम्‍बो कोविड सेंटर्स, कोरोना काळजी केंद्र १ (सीसीसी १), कोरोना काळजी केंद्र २ (सीसीसी २) यामध्‍ये कोविड बाधितांसाठी बेड सुसज्ज असून उपचारार्थ उपलब्‍ध आहेत. यामध्‍ये जवळपास २ हजार व्‍हेंटिलेटर रुग्णशय्या आहेत. वेगवेगळ्या जम्‍बो कोविड सेंटर्समध्‍ये पहिल्‍या टप्‍प्‍यामध्‍ये मिळून सुमारे ७ हजार ३०७ रुग्‍णशय्यांची क्षमता विकसित करण्‍यात आली. त्‍यावर जवळपास ७७ हजार रुग्‍णांवर उपचार करण्‍यात आले. आता जम्‍बो कोविड सेंटर्समध्‍ये दुसऱया टप्‍प्‍यामध्‍ये ८ हजार ३५० नवीन रुग्‍णशय्या क्षमता विकसित होण्‍याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. यात कांजूरमार्ग येथे २ हजार २००, मालाडमध्‍ये २ हजार २००, शीव येथे १ हजार २००, वरळी रेसकोर्स येथे ४५०, भायखळा येथील रिचर्डसन एण्‍ड क्रूडासमध्‍ये ७००, गोरेगांव नेस्‍को १ हजार ५००, वरळी एनएससीआय येथे १०० याप्रमाणे बेड क्षमता वाढवण्‍यात आली आहे. जम्‍बो सेंटर्समधील बेड क्षमता एकूण १५ हजार ६५७ इतकी होत आहे. यातील ७० टक्‍के बेड वाहिनीद्वारे ऑक्सिजन पुरवठा असणाऱया आहेत. प्रत्‍येक जम्‍बो कोविड सेंटरमध्‍ये द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजन साठवण टाक्‍या उपलब्‍ध आहेत. ऑक्सिजन सिलेंडर्स बॅकअपसह विविध रुग्णालयांमध्ये वातावरणातील हवेतून वैद्यकीय ऑक्सिजन निर्माण उत्पादीत करणारी व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्‍यामुळे ऑक्सिजनची अडचण नाही, असे काकाणी यांनी नमूद केले.

लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष -

पुढे ते म्‍हणाले की, तिसऱ्या लाटेचा सामना करताना लहान मुलांची विशेष काळजी घेण्‍याच्‍या सूचना लक्षात घेता, महानगरपालिकेच्या प्रत्येक रुग्‍णालय, वैद्यकीय महाविद्यालयासह जम्‍बो कोविड सेंटर्समध्‍येही लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्‍यात येत आहे. कोविड-१९ संसर्गाच्‍या अनुषंगाने उपचारांबाबत मार्गदर्शन करण्‍यासाठी आतापर्यंत तीन वेळा बालरोग तज्‍ज्ञांची कार्यशाळा घेण्यात आली आहे. मुलांच्या उपचारांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, याकडे विशेष लक्ष देत आहोत. तसेच, कोविड बाधित गरोदर मातांसाठी देखील स्वतंत्र कक्ष उभारण्‍यात आले असून त्‍यांची विशेष व्यवस्था केली जाणार आहे, असेही काकाणी यांनी यावेळी नमूद केले. सद्यस्थितीत कोविडच्‍या दुसरी लाट ओसरली असली आणि कोविड प्रतिबंधक लसीकरण वेगाने सुरु असले तरी, सर्व मुंबईकर नागरिकांनी प्रतिबंधक नियमांचे योग्‍यरित्‍या पालन केले पाहिजे. लहान मुलांसह संपूर्ण कुटुंबाची योग्‍य काळजी घ्‍यावी, असे आवाहनही त्‍यांनी प्रशासनाच्‍यावतीने केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.