ETV Bharat / city

अर्थसंकल्प सादर करताना सहआयुक्त पाणी समजून प्यायले सॅनिटाईझर

author img

By

Published : Feb 3, 2021, 4:32 PM IST

Updated : Feb 3, 2021, 5:34 PM IST

सॅनिटायझर गेल्याने पवार तोंड धुण्यासाठी सभागृहाबाहेर गेले. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. सभागृहामधील उपस्थितांना काही माहीत होण्याच्या आतच पवार पुन्हा सभागृहात आले आणि अर्थसंकल्पाचे वाचन केले.

मुंबई
मुंबई

मुंबई - महापालिकेच्या शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर करणारे सहआयुक्त रमेश पवार यावेळी पाण्याऐवजी सॅनिटायझर पिल्याने अर्थसंकल्प सादर करण्यास थोडा उशीर झाला. सॅनिटायझर गेल्याने पवार तोंड धुण्यासाठी सभागृहाबाहेर गेले. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. सभागृहामधील उपस्थितांना काही माहीत होण्याच्या आतच पवार पुन्हा सभागृहात आले आणि अर्थसंकल्पाचे वाचन केले.

पाण्याच्या बाटल्या आणि सॅनिटायझर सारखेच दिसत असल्याने घोटाळा

मला वाटले भाषण सुरू करण्यापूर्वी आपण पाणी प्यावे, म्हणून मी बाटली उचलली आणि प्यायला लागलो. तिथे ठेवलेल्या पाण्याच्या बाटल्या आणि सॅनिटायझर सारखेच दिसत होते, त्यामुळे असे घडले. ते प्यायल्याबरोबरच माझ्या लक्षात आले की, हे पाणी नव्हे त्यामुळे मी संपूर्ण गिळले नाही, असे अर्थसंकल्पानंतर माध्यमांशी बोलताना पवार यांनी सांगितले. त्यावेळी शिक्षण समितीच्या अध्यक्षा संध्या दोशी यांनी त्यांना तातडीने पाण्याची बाटली दिली. थोड्या वेळाने त्यांना बरे वाटले आणि त्यांनी अर्थसंकल्प अहवाल वाचण्यास सुरुवात केली. शिक्षण विभागाचे सहआयुक्त आशुतोष सलील यांची तब्येत बरी नसल्याने रमेश पवार यांच्यावर अर्थसंकल्प वाचनाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

मुंबई

दरम्यान, जागतिक दर्जाचे शहर म्हणून ओळख व देशाची आर्थिक राजधानी असलेल्या, देशातील श्रीमंत अशा मुंबई शहराच्या महापालिकेचा सन २०२१-२२ चा ३९ हजार ०३८.८३ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. पालिका आयुक्त इकबाल सिंग यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सादर केला. पालिकेचा २०२१-२२ चा अर्थसंकल्प सन २०२०-२१ पेक्षा ५ हजार ५९७.८१ कोटींनी वाढला आहे. सन २०२०-२१ मध्ये ३३ हजार ४४१.०२ कोटींचा, सन २०१९-२० चा अर्थसंकल्प ३० हजार ६९२ कोटींचा होता. तर २०१८-१९ आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प २७ हजार २५८ कोटी रुपये इतका सादर करण्यात आला होता.

Last Updated : Feb 3, 2021, 5:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.