ETV Bharat / city

कोरोना लस - कोल्ड स्टोरेजसाठी पालिकेकडून जागेचा शोध, कांजूरची जागा निश्चित, तीन ठिकाणी ठेवणार लस

मुंबई महापालिकेने कोरोनाची लस ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेजची जागा शोधण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत करोडोच्या संख्येने लस लागणार असून ती ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेजची गरज लागणार आहे. पूर्व उपनगरात कांजूरमार्ग येथील जागा जवळपास निश्चित झाली असून आणखी दोन ठिकाणी जागेचा शोध सुरू आहे.

vaccine
प्रतिकात्मक फोटो
author img

By

Published : Nov 30, 2020, 12:51 PM IST

मुंबई - मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लसीचा अभ्यास सुरू आहे. ही लस कधी उपलब्ध होईल, याची नेमकी तारीख जाहीर करण्यात आली नसली तरी महापालिकेने ही लस ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेजची जागा शोधण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत करोडोच्या संख्येने लस लागणार असून ती ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेजची जागा लागणार आहे. पूर्व उपनगरात कांजूरमार्ग येथील जागा जवळपास निश्चित झाली आहे. आणखी दोन ठिकाणी जागेचा शोध सुरू असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जगभरात शंभरहून अधिक देश लसीवर संशोधन करत आहेत. भारतातही पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने अमेरिकेच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीची निर्मिती सुरू केली आहे. या लसीची मुंबई महापालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयात चाचणी सुरू केली आहे.

कोल्ड स्टोरेजसाठी जागा -
मुंबईची लोकसंख्या सुमारे दीडकोटी असून भविष्यात कोरोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी कोरोनावर लस हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे जगात कुठल्याही देशात कोरोनावर मात करणारी लस उपलब्ध झाल्यास लस ठेवण्यासाठी अतिथंड जागेची म्हणजेच कोल्ड स्टोरेजची गरज भासणार आहे. मुंबई महापालिकेने लस कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यासाठी जागेचा शोध सुरू केला आहे. एका कोल्ड स्टोरेजमध्ये हजारो-लाखोंच्या संख्येने लस ठेवता येईल, अशा जागेचा शोध सुरू असल्याचे सुरेश काकाणी यांनी सांगितले. दरम्यान, पालिकेच्या मालकीच्या अथवा खासगी जागेचा शोध घेतला जात असल्याचे ते म्हणाले. पूर्व उपनगरात कांजूरमार्ग येथील जागा जवळपास निश्चित झाली आहे. मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरात जागेचा शोध सुरू आहे. मुंबईत लस ठेवण्यासाठी विभागवार तीन जागा निश्चित केल्यास लस विभागवार त्वरित पोहचवणे शक्य होणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले.

लवकरच लस येईल -
कोरोनावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध झाली नसली तरी भारतासह अनेक देशात कोरोना लसीची अंतिम चाचणी यशस्वी होण्याच्या प्रतीक्षेत जगभरातील देशांचे लक्ष लागले आहे. भारतातही कोरोनावर लस तयार करण्याचे काम पुण्यातील सिरम इन्सिट्युटने सुरू केले आहे. अंतिम चाचणी यशस्वी होण्याची प्रतीक्षा आहे. डिसेंबर अथवा जानेवारी २०२१ पर्यंत कोरोनावर मात करण्यासाठी लस उपलब्ध होईल, असे संकेत मिळत आहेत. मुंबईत राज्य सरकारसह पालिकेच्या आरोग्य विभागाने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोरोना नियंत्रणात येत आहे. तरीही कोरोनावर लस उपलब्ध कधी होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

लस प्रथम कोरोना योद्ध्यांना देणार -
कोरोनावर मात करणारी लस लवकरच उपलब्ध होईल, असे संकेत जगभरातून मिळू लागले आहेत. मुंबईत कोरोनाची लस उपलब्ध झाल्यानंतर प्रथम ती लस कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, वॉर्ड बाॅय यांना दिली जाणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले.

हेही वाचा -कोरोना लस विकसित करणाऱ्या तीन टीमसोबत पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे साधणार संवाद

हेही वाचा -देशात 4 लाख 46 हजार सक्रिय कोरोना रुग्ण; तर रिकव्हरी रेट 93.81 टक्के

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.