ETV Bharat / city

BMC has Taken pre Monsoon Measures : मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून पालिकेने केल्या 'या' उपाययोजना - BMC has Taken pre Monsoon Measures

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात पावसाचे पाणी साचते. यामुळे मुंबईची तुंबई होते. मुंबईची तुंबई झाली की वाहतूक ठप्प होऊन मुंबई थांबते. यामुळे पालिकेवर टीका होत आली आहे. यासाठी पालिकेने नालेसफाई सोबतच इतर उपाययोजनांवर लक्ष दिले आहे. यामुळे पाणी साचणार नाही आणि मुंबई थांबणार नाही, असा विश्वास मुंबई महापालिकेकडून व्यक्त करण्यात आला ( BMC has Taken pre Monsoon Measures ) आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 18, 2022, 5:32 PM IST

मुंबई - मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात पावसाचे पाणी साचते. यामुळे मुंबईची तुंबई होते. मुंबईची तुंबई झाली की वाहतूक ठप्प होऊन मुंबई थांबते. यामुळे पालिकेवर टीका होत आली आहे. यासाठी पालिकेने नालेसफाई सोबतच इतर उपाययोजनांवर लक्ष दिले आहे. यामुळे पाणी साचणार नाही आणि मुंबई थांबणार नाही, असा विश्वास मुंबई महापालिकेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

माहिती देताना पालिका आयुक्त चहल

मुंबईची तुंबई - मुंबईत गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण वाढले आहे. जून ते सप्टेबर, असे चार महिने पावसाचे असले तरी काही दिवसात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडतो. यामुळे समुद्रात पाणी जाण्याच्या मार्गावर ताण येऊन पाणी शहरात दादर, हिंदमाता, माटुंगा किंग सर्कल, सायन आदी भागात पाणी साचते. पाणी साचल्याने मुंबईची तुंबई होऊन वाहतूक ठप्प होऊन शहरातील सर्व व्यवहार बंद होऊन मुंबई ठप्प होते.

नालेसफाईची कामे सुरू - मुंबईची तुंबई होऊ नये, मुंबई ठप्प होऊ नये यासाठी पालिकेने नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली आहे. ३४० किलोमीटरच्या नालेसफाईसाठी १६० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. पावसाळ्याआधी ७५ टक्के गाळ तीन टप्प्यात काढला जाणार आहे. ५० टक्के गाळ मे महिन्याच्या सुरुवातीला काढला जाणार आहे. जे कंत्राटदार मे महिन्याच्या सुरुवातीला ५० टक्के गाळ काढणार नाहीत, त्यांना पुढील दोन टप्प्याचे काम दिले जाणार नाही. ते काम इतर कंत्राटदारांकडून करून घेतले जाणार आहे. नालेसफाई आठ तास केली जात होती. त्यात वेग येण्यासाठी सोळा तास म्हणजेच दोन शिफ्टमध्ये करण्याचे आणि दुप्पट मशिनरी वापरण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी कंत्राटदारांना दिले आहे.

४०० ठिकाणी पंप - मुंबईच्या भौगोलिक परिस्थितीमुळे पाणी साचले की ते उपसा करून समुद्रात सोडले जाते. त्यासाठी पालिका मोठ्या संख्येने पंप लावते. याआधी मुंबईत २५० पंप लावले जात होते. गेल्या काही वर्षात ही संख्या वाढवून ३०० पंप लावण्यात येत आहेत. यंदा पंपाची संख्या वाढवण्यात आली असून ४०० पंप लावले जाणार आहेत. यासाठी पालिका ८० ते ९० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

'या' केल्या उपाययोजना - पावसात विशेष करून दादर हिंदमाता येथे पाणी साचते. या पाण्याचा निचरा करण्यासाठी जवळच असलेल्या दिवंगत प्रमोद महाजन गार्डन येथे व झेवीयर्स गार्डन येथे भूमिगत टाक्या बांधल्या जात आहेत. याचे काम या पावसाआधी पूर्ण होईल. पावसाचे पाणी समुद्रात सोडता यावे म्हणून टाटा मिलच्या जागेत जमिनीखालून पाईपलाईन टाकली जात आहे. पाणी साचल्याने हिंदमाता ते परळ दरम्यान वाहतूक बंद होते. ही वाहतूक बंद होऊ नये म्हणून दोन रॅम्प उभारण्यात येणार आहेत. यामुळे पाणी साचले तरी वाहतूक बंद पडणार नाही, हिंदमाता येथे पाणी साचणार नाही, असे पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी ( BMC Commissioner Iqbal Singh Chahal ) सांगितले आहे. येत्या २ ते ३ वर्षात ८०० कोटी रुपये खर्च करून माहुल व मोगरा असे दोन पम्पिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. ही पंपिंग स्टेशन उभारल्यावर मुंबई खऱ्या अर्थाने पुरमुक्त होईल, असा विश्वास पालिका आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

२५० कोटींचा खर्च - मुंबईत या वर्षी पाणी साचू नये म्हणून नालेसफाई केली जात आहे. या नालेसफाईवर १६० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच पाण्याचा उपसा करण्यासाठी ४०० पंप लावले जाणार आहेत. त्यासाठी ८० ते ९० कोटी असे एकूण २५० कोटी रुपये खर्च केले जात असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी दिली.

आमची तयारी भक्कम - मागील वर्षी १७ आणि १८ जुलैला ३ तासात २८५ मिलिमीटर पाऊस पडला. एका तासात ९० ते १०० मिलिमीटर पाऊस पडला. राज्याच्या धोरणानुसार २४ तासांत ६५ मिलिमीटर पाऊस पडला तर पूरस्थिती निर्माण झाली, असे बोलले जाते. अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर पाणी साचणार नाही, अशी हमी देणे कोणालाही अशक्य आहे. पण, ६५ मिलिमीटर पाऊस पडला तरी त्यासाठी आमची तयारी भक्कम राहील, अशी ग्वाही पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली ( BMC Commissioner Iqbal Singh Chahal ) आहे.

हेही वाचा - Vadapav Price Hike : मुंबईच्या वडापावला महागाईचा फटका; खवय्यांना लागणार ठसका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.