ETV Bharat / city

Pipeline leakage In Mumbai : नामजोशी मार्गावर पाईपलाईन लिकेजचे काम पालिका कर्मचाऱ्यांकडून पुर्ण

author img

By

Published : Mar 16, 2022, 7:43 AM IST

नामजोशी मार्गावर पाईपलाईन लिकेज झाल्याची तक्रार पालिकेला मिळाली. या तक्रारीची दखल घेत पालिकेचे कर्मचाऱ्यांनी ही पाईपलाईन दुरुस्त केली. (Pipeline leakage In Mumbai) पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा प्रवाह खंडित करून लिकेज शोधून काढला. तो जमिनीच्या पंधरा फूट खाली आढळला. त्यानंतर हे काम करण्यात आले.

पाईपलाईन लिकेज
पाईपलाईन लिकेज

मुंबई - उन्हाचा वाढता उकाडा व त्यामुळे होणारी पाणी कपात, यामुळे उन्हाळ्याच्या तीन महिन्यात मुंबईकरांचे प्रचंड हाल होत असतात. आणि त्यात भर पडत असते ती वारंवार लिकेज होणाऱ्या जुन्या पाईपलाईनची. (Pipeline leakage On Namjoshi Road) याचा फटका जितका सामान्य नागरिकांना बसतो तितकाच तो पालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही बसत असतो. त्याचे उदाहरण आज नामजोशी मार्गावर पाहायला मिळाले.

व्हिडिओ

नेमक काय झाले ?

नामजोशी मार्गावर पाईपलाईन लिकेज झाल्याची तक्रार पालिकेला मिळाली. या तक्रारीची दखल घेत पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ही पाईपलाईन दुरुस्त करणे महत्त्वाचे होते कारण याच पाईप लाईन मधून पश्चिम विभागाला देखील पाणीपुरवठा होतो. मात्र, नेमका लिकेज कुठे आहे हे शोधणे कर्मचार्‍यांसाठी आव्हान होते.

15 फूट जमिनी खाली उतरून केली दुरुस्ती

पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा प्रवाह खंडित करून लिकेज शोधून काढला. तो जमिनीच्या पंधरा फूट खाली आढळला. अपुऱ्या साधनसामग्रीच्या व टॉर्चच्या आधारे जमिनीच्या खाली जिथे ऑक्सिजन देखील कमी मिळतो अशा पंधरा फुटांपर्यंत खाली जाऊन पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ही पाईपलाईन दुरुस्त केली. दरम्यान, पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या कार्य तत्परतेमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय टाळला त्यामुळे सध्या या कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.

हेही वाचा - TET Scam Chargesheet Filled : टीईटी घोटाळा प्रकरणात तीन हजार 955 पानांचं दोषारोपपत्र दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.