ETV Bharat / city

Independence Day मुंबईकरांना सोयी सुविधा देण्यासाठी पालिका कटिबद्ध - मुंबई पालिका सुविधा

प्रमुख सोयी सुविधांव्यतिरिक्त अनेक नागरी कामांना गती देणे व करदात्या नागरिकांप्रती असलेले दायित्व पूर्ण करणे हयाकरिता बृहन्मुंबई महानगरपालिका सदैव कटीबद्ध असल्याचे मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी म्हटले आहे.

Iqbal Singh Chahal
इकबाल सिंग चहल
author img

By

Published : Aug 15, 2022, 6:57 PM IST

मुंबई पाणी पुरवठा, रस्ते, कचऱ्याची विल्हेवाट, मलनिःसारण आणि आरोग्य हया मुख्य सुविधा अधिकाधिक सक्षमतेने आणि सुरळीतपणे पुरविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सदैव कटीबद्ध आहे. प्रमुख सोयी सुविधांव्यतिरिक्त अनेक नागरी कामांना गती देणे व करदात्या नागरिकांप्रती असलेले दायित्व पूर्ण करणे हयाकरिता बृहन्मुंबई महानगरपालिका सदैव कटीबद्ध असल्याचे मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी म्हटले आहे.

मागेल त्याला पाणी देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. याच अनुषंगाने मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्या हस्ते पालिका मुख्यालयावर धवजारोहण करण्यात आले. यावेळी ते उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी बोलताना, १३ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान राबविण्यात येणाऱया ''हर घर तिरंगा'' अभियानासाठी ४१ लाख राष्ट्रध्वज विकत घेवुन नागरिकांना मोफत वाटले. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे आयुक्तांनी आभार मानले. पालिकेने मागेल त्याला पाणी या योजनेअंतर्गत ०१.०१. २००० नंतरच्या झोपडपट्टीधारकांना खाजगी व सरकारी जमिनीवर वसलेल्या झोपडपट्टीधारकांना, गावठाण व कोळीवाड्यातील बांधकामे व काही कारणासाठी अपूर्ण राहिलेल्या तसेच अनधिकृत इमारतीमध्ये राहणाऱया रहिवाश्यांना रितसर अर्ज करुन अधिकृत जलजोडणी प्राप्त करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. त्यासाठी नागरिकांनी अर्ज करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले.

ई वाहने घेण्याचे प्रस्तावित स्वच्छ भारत अभियान राबविण्यासाठी पालिकेने ३५ ई – वाहने परिवहन विभागामार्फत घेण्याचे प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे ओल्या कचऱयाची विकेंद्रकित स्वरुपात विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई शहरात ९ ठिकाणी २ मेट्रिक टन क्षमतेची बायोमिथेशन सयंत्रे उभारण्यासाठी निविदा प्रकिया सुरु आहे. मुंबईत निर्माण होणाऱया सुमारे ७० टन प्रतिदिन इतक्या घरगुती कचऱयावर (Domestic Hazardous Waste) शास्त्रोक्त प्रक्रिया करण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेने ३ प्रकल्प कार्यान्वित केले असून ८ नवीन प्रकल्पांसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. २०२१ पर्यंत १२,८१९ आसनांची ५६२ स्वच्छतागृहे बांधून पूर्ण झाली आहेत.६६३५ आसनांच्या २६६ स्वच्छतागृहांचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच २०२२ वर्षासाठी १९,४५४ आसने असलेली ८२८ सामुदायिक स्वच्छतागृहे बांधण्याचे लक्ष्य आहे. घन कचरा व्यवस्थापन कर्मचाऱयांसाठी ४६ वसाहतींमध्ये केवळ ५५९२ सेवा निवासस्थाने उपलब्ध आहेत. घन कचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱयांना चांगल्या निवासी सुविधा देण्याकरिता उपलब्ध ३० वसाहतींचा पुनर्विकास करुन १३,००० सेवा निवासस्थाने निर्माण करण्याचे प्रस्ताविले असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

नागरिकांना सोयी सुविधा देण्यावर भर महापालिकेने कोरोना नियंत्रणात आणण्यात व थोपविण्यात यशस्वी झाली असून याबद्दल वेळोवेळी जागतिक आरोग्य संघटनेने बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कौतुक केले आहे. यामधून बृहन्मुंबई महानगरपालिकेने बोध घेऊन मुंबईकरांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी प्राथमिक आरोग्य सुविधा बळकटीकरणावर भर दिला आहे. विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देता यावे म्हणूनपालिकेकडून त्याप्रकारच्या शाळा आणि सोयी सुविधा उभारल्या जात आहेत. मुंबईमधील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड उभारण्यात आला आहे. २०२२ – २३ च्या अखेरीस प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. दर्जेदार रस्ते उभारण्यासाठी मुंबईमधील रस्ते काँक्रीटचे उभारले जात आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत नागरिकांकरिता रोजगाराच्या मोठया संधी उपलब्ध आहेत. शहराच्या आर्थिक विकासात महिलांचा सहभाग व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रथमच महत्वाची पावले उचलली आहेत. विभक्त कुटुंबाच्या वाढत्या संस्कृतीमुळे मुंबईमध्ये वृध्दांसाठी सुरक्षित ठिकाणे बनविणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने ही गरज ओळखून पी/दक्षिण विभागामध्ये पहिले वृध्दाश्रम बनविण्याचे प्रस्तावित केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.