ETV Bharat / city

गोरेगावमधील रहिवाशांचे त्याच परिसरात होणार पुनर्वसन - पालिका आयुक्तांचे आश्वासन - Congress leader Bhai Jagtap latest news

मुंबई काँग्रेस शिष्टमंडळाने शहरातील विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी मुंबई पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांची भेट घेतली. यावेळी शास्त्रीनगर रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबतचा मुद्यावर चर्चा झाली.

congress press meet
काँग्रेसची पत्रकार परिषद
author img

By

Published : Mar 15, 2021, 10:07 PM IST

मुंबई - गोरेगाव शास्त्रीनगरमधील नाले रुंदीकरणात येथील रहिवाशांच्या झोपड्या जाणार आहेत. येथील रहिवाशांचे पुनर्वसन पाच किमी अंतराच्या परिसरातच केले जाणार असल्याचे आश्वासन मुंबई पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी सोमवारी मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळास दिले.

मुंबई काँग्रेस शिष्टमंडळाने शहरातील विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी मुंबई पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांची भेट घेतली. यावेळी शास्त्रीनगर रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबतचा मुद्यावर चर्चा झाली.

हेही वाचा-मुंबई- रुग्णांच्या संख्येत वाढ होऊनही कोविड सेंटरमधील 60 टक्के खाटा रिकाम्या

उपोषण सुरू -
मुंबई पालिकेकडून शास्त्रीनगर येथील नाला रुंदीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. नाला रुंदीकरण करताना तेथील झोपड्या बाधित होणार असल्याने तेथील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. झोपडीधारकांचे पुनर्वसन कुठे होणार याबाबत नागरिकांना ठोस आश्वासन मिळाले नसल्याने त्यांच्यात संभ्रमावस्था आहे. या कुटुंबाचे पुनर्वसन वाशी नाका येथे न करता मालाडमधील एसआरए प्रकल्पासाठी राखीव असलेल्या ठिकाणी व्हावे, अशी मागणी पुढे आली आहे. त्यासाठी स्थानिकांनी सोमवारपासून उपोषणही सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा आदींच्या शिष्टमंडळाने सोमवारी पालिका आयुक्त चहल यांची भेट घेतली यावेळी पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित झाला.

हेही वाचा-२ हजार रुपयांच्या नोटांची दोन वर्षे छपाई नाही- अनुरागसिंह ठाकूर

तर झोपडी तोडू नका -
मालाडमधील आप्पापाडा येथील एसआरए प्रकल्पातील घरांचा ताबा पुनर्वसनाच्या उद्देशाने पालिकेकडे देण्यात आला आहे. त्यामुळे लांब अंतरावर पुनर्वसन करण्याऐवजी मालाडमध्येच करण्यासाठी रहिवाशी आग्रही आहेत. तेव्हा त्याप्रकारची मागणी आयुक्तांसमोर केल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. तसेच, शास्त्रीनगर येथे पालिकेकडून तेथील बांधकाम तोडण्याचे कामदेखील थांबविण्यात आले असल्याचे जगताप यांनी म्हटले आहे. रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय झोपडी तोडू नये, अशी मागणीही केली असल्याचे जगताप यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.