ETV Bharat / city

BMC to control Omicron spread : ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्याकरिता मुंबई महापालिकेकडून 'या' उपाययोजना सुरू - मुंबई महापालिका विमान प्रवासी क्वारंटाईन नियम

मुंबईमध्ये गेले पावणे दोन वर्ष केरोनाचा विषाणूचा प्रसार (Omicron spread ) आहे. हा प्रसार कमी होत असतानाच ओमायक्रॉन हा कोरोनाचा नवीन व्हेरियंट समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर दादर चैत्यभूमी येथे जाऊन सुरेश काकाणी यांनी आढावा घेतला. यानंतर पत्रकारांशी बोलताना ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पालिका सज्ज असल्याची ( Sursh Kakani on measures of BMC ) माहिती त्यांनी दिली.

मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी

author img

By

Published : Dec 6, 2021, 6:17 PM IST

Updated : Dec 6, 2021, 6:34 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये ओमायक्रॉन विषाणूचा रुग्ण अद्याप आढळून आला नाही. तरी तो आढळून आला आहे, अशा पद्धतीनेच महापालिकेने तयारी सुरू केली आहे. शाळा सुरू करण्याबाबत पुन्हा आढावा घेतला जाईल, अशी माहिती मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी ( BMC additional commissioner Suresh Kakani ) यांनी दिली. तसेच महापरिनिर्वाण दिनाला आलेल्या अनुयायांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली जात असल्याचे काकाणी यांनी सागितले.

मुंबईमध्ये गेले पावणे दोन वर्ष केरोनाचा विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार कमी होत असतानाच ओमायक्रॉन हा कोरोनाचा नवीन व्हेरियंट समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर दादर चैत्यभूमी येथे जाऊन सुरेश काकाणी यांनी आढावा घेतला. यानंतर पत्रकारांशी बोलताना ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पालिका सज्ज असल्याची ( Sursh Kakani on measures of BMC ) माहिती त्यांनी दिली.

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पालिका सज्ज

हेही वाचा-Omicron Variant - ओमायक्रॉनच्या संसर्गाचा वेग प्रचंड, काळजी घेण्याची गरज - आरोग्यमंत्री

बेड्सची कोणत्याही प्रकारे कमतरता भासणार नाही

सध्या मुंबईमध्ये १५ हजार बेड्स उपलब्ध आहेत. काही कोविड सेंटर सज्ज ठेवले आहेत. ही कोविड सेंटर सुरू झाल्यावर बेड्सची संख्या ३० हजार इतकी होईल. इतर कोविड सेंटरमध्ये आणखी ७० हजार बेड्स तयार आहेत. तिसरी लाट येणार असे सांगितले जात होते. त्यासाठी पालिकेने लहान मुलांसाठी १५०० बेड्स सज्ज ठेवली ( Vacant beds for children in Mumbai ) आहेत. लहान मुलांसाठी मास्क आणि व्हेंटीलेटरही तयार ठेवण्यात ( Reserved bed and masks for children by BMC ) आले आहेत. यामुळे बेड्सची कोणत्याही प्रकारे कमतरता भासणार नाही असे काकाणी यांनी सांगितले.

हेही वाचा-Omicron Variant : राज्याची चिंता वाढली.. पिंपरी-चिंचवडमध्ये 6 तर पुण्यात ओमायक्रॉनबाधित एक रुग्ण

१९ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह -
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या केल्या जात आहेत. त्यात १९ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पालिकेचे हेल्थ पोस्ट आणि वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून हे प्रवासी क्वारंटाईनच्या नियमांची ( air passengers quarantine rule in Mumbai ) अंमलबजावणी करतात की नाही, हे पाहिले जात आहे. तसेच त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली जात आहे. या प्रवाशांच्या जिनोम सिक्वेंसिंगचा चाचण्या केल्या जात आहेत. त्याचे अहवाल उद्यापासून यायला सुरुवात होईल, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. जे प्रवासी मुंबईत येत आहेत त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी काही हॉटेल तसेच पालिकेचे कोविड सेंटर सज्ज ठेवले आहे. ज्यांना पैसे भरून हॉटेलमध्ये जायचे आहे ते हॉटेलमध्ये तर ज्यांना पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये जायचे असेल ते त्या ठिकाणी जाऊ शकतात, असे काकाणी यांनी सांगितले.

हेही वाचा-Omicron Variant: गोव्यात ओमायक्रॉनची दहशत आणि निवडणुकीचे वारे

शाळा सुरू कारण्याबाबत आढावा -
कोरोना विषाणूचा प्रसार कमी झाल्याने राज्य सरकारने इयत्ता १ ली पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, राज्यात आणि देशात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करायच्या की नाहीत याबाबत पुन्हा आढावा घेतला जाईल, असे काकाणी यांनी सांगितले.

भीम अनुयायांच्या आरोग्याची काळजी -
महापरिनिर्वाण दिनी आलेल्या भीम अनुयायांचे रेल्वे स्थानकावर स्क्रीनिंग केले जात आहे. त्यांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे. कोरोना चाचण्या आणि लसीकरण केले जात आहे. मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले जात आहे. कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन आंबेडकरी अनुयायांना केले जात आहे. चैत्यभूमी येथे आलेल्या सुमारे एक हजार अनुयायांना कोरोना प्रतिबंधक ( BMC vaccination at Chaityabhoomi ) लस देण्यात आली आहे. गर्दी वाढल्यास लसीकरणाचे काउंटर वाढवली जातील, असे काकाणी यांनी सांगितले.

Last Updated : Dec 6, 2021, 6:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.