मुंबई - काल दसरा मेळाव्या निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बीकेसी मध्ये झालेली सभा व त्या सभेला लोटलेली अलोट गर्दी ही संपत्तीचे प्रदर्शन व सत्तेचा माज असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली ( Ambadas Danve criticize Eknath Shinde ) आहे . येणाऱ्या दिवसात जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. मुंबई ते बोलत होते.
शिवतीर्थावर गर्दी, लोकांची दर्दी ? - दसरा मेल्यावरून उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या सभेला चढाओढ लागलेली असताना बीकेसी मध्ये एकनाथ शिंदे यांच्या सभेला लोटलेली अलोट गर्दी व मुख्यमंत्री एकनाथशिंदे यांनी केलेली उद्धव ठाकरे व त्यांच्या परिवारावरील टीका याला शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, गर्दी तर बाजारात सुद्धा होते. परंतु शिवसेनेच्या मेळाव्याला आलेली गर्दी ही दर्दी लोकांची होती. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची ती गर्दी असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर व हिंदुत्वावर प्रेम करणारी लोक इथे उपस्थित होते. परंतु दुसरीकडे आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी बीकेसीमध्ये जमा झालेली गर्दी ही बाहेरील लोकांची होती. यामध्ये कुणी सांगितले की, आम्ही मुंबई फिरायला आलो आहोत. तर कोण म्हणतं होत की, आम्ही मजा करायला आलो आहोत. कित्येक लोकांना तर हे सुद्धा माहीत नव्हते की, ते कोणाच्या सभेसाठी आले आहेत. त्या उलट शिवसेनेच्या सभेला जे मजूर आले त्यांनी सांगितलं की आम्ही आमची दिवसाची मजुरी सोडून उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकायला आले आहोत. परंतु बीकेसीमधील जी गर्दी होती ती ते संपत्तीचे प्रदर्शन व सत्तेचा माज ( BKC crowd is wealth show of and power show of ) होता. येणाऱ्या दिवसांमध्ये सर्वसामान्य जनता हा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, असेही अंबादास दानवे यांनी म्हटल आहे.
एकनाथ शिंदे हे कटप्पाच ? - काल बीकेसीमध्ये सभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी ठाकरे कुटुंबावर जहरी टीका केली ( Eknath Shinde criticize Thackeray family ) आहे. यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना कटप्पाची उपमा दिली ( Eknath Shinde is Kattappa says Ambadas Danve ) आहे. ती योग्यच आहे. कटप्पा ने स्वतःच्या राजाचा विश्वासघात केला, त्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी ठाकरे कुटुंबाचा विश्वासघात केला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या निधनानंतर त्यांची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे अशी विचारणा एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचं त्यांनी सांगितलं. या विषयावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, इतके वर्ष ते गप्प का राहिले होते. इतकी वर्ष त्यांनी ही गोष्ट लपवली म्हणजे हा त्यांचा स्वार्थीपणाच आहे, असेही ते म्हणाले. आदिपुरुष या चित्रपटामध्ये देव देवतांचे विडंबन केलं गेल्याची घटना समोर येत आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले अशा कुठल्याही सिनेमाच्या माध्यमातून हे होता कामा नये, जर असं झालं तर ते त्याला विरोध करतील.