ETV Bharat / city

Marathi Dandiya 2022 : मराठी दांडियातून भाजपचे निवडणुकीवर लक्ष, शिवसेनेसाठी ठरणार चिंतेचा विषय? - BJPs Marathi Dandiya

दसऱ्यासाठी आता फक्त ३ दिवसाचा अवधी असताना मुंबईतील मराठी दांडिया प्रेमींना आकर्षित करण्यासाठी भाजप तर्फे आयोजित, 'मराठी दांडिया' महोत्सवात नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला भेटत (BJPs Marathi Dandiya) आहे. येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने आयोजित केलेल्या या मराठी दांडियाने शिवसेनेच्या गटात चिंतेचे वातावरण निर्माण झालं (BJPs Marathi Dandiya concern matter for Shiv Sena) आहे.

BJP state president Chandrasekhar Bawankule
भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
author img

By

Published : Oct 2, 2022, 12:20 PM IST

मुंबई : देशभरात सध्या नवरात्रीची धूम सुरू असताना मुंबईतही नवरात्र उत्सव जोमात सुरू आहे. दसऱ्यासाठी आता फक्त ३ दिवसाचा अवधी असताना मुंबईतील मराठी दांडिया प्रेमींना आकर्षित करण्यासाठी भाजप तर्फे आयोजित, 'मराठी दांडिया' महोत्सवात नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला भेटत (BJPs Marathi Dandiya) आहे. येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने आयोजित केलेल्या या मराठी दांडियाने शिवसेनेच्या गटात चिंतेचे वातावरण निर्माण झालं (BJPs Marathi Dandiya concern matter for Shiv Sena) आहे.

उद्देश मराठी दांडिया, लक्ष निवडणुक - अगोदर दहीहंडी नंतर गणेशोत्सव व आता नवरात्री या सर्व हिंदू सणांवरील निर्बंध हटवल्याकारणाने हा सण सध्या जोमात सुरू आहे. आता सुरू असलेल्या नवरात्र उत्सवात सुद्धा दांडिया प्रेमींची मोठी गर्दी सर्व ठिकाणी दिसून येत आहे. त्यातच भाजपतर्फे दक्षिण मुंबईत आयोजित केलेल्या मराठी दांडिया उत्सवामध्ये मराठी दांडिया प्रेमिंसोबत मराठी कलाकारांची उपस्थिती या दांडियाचं आकर्षण ठरत आहे. इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुका पाहता मराठी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. त्यानुसार दक्षिण मुंबईतील लालबाग, परेल, माझगाव, शिवडी, दादर, भायखळा या परिसरातील मराठी प्रेमींना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते व त्यांची टीम ही मराठी दांडिया प्रेमींना आपल्या तालावर नाचवताना दिसून येत आहे. मुंबईत काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदानात दांडियाचे आयोजन करण्यात आलं आहे.दररोज या दांडीयाकडे हजारोंच्या संख्येने दांडियाप्रेमी आकर्षित होताना दिसत आहेत, ही गोष्ट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटासाठी चिंतेचीच (Marathi Dandiya 2022) आहे.

मराठी माणसं फोडण्याचे काम - भाजपने मुंबईत मराठी दांडियांचं आयोजन केल्यानंतर मुंबईतील मराठी माणसांना फोडण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, असा आरोप शिवसेनेकडून भाजपवर लावण्यात आला. विशेष म्हणजे भाजपने मुंबईमध्ये जवळपास ३०० दांडिया कार्यक्रमाचं आयोजन केलं असून याला दांडिया प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या सर्व गरब्यांना मोफत निशुल्क पास देण्यात आले असल्याकारणाने सुद्धा दांडिया प्रेमीमध्ये उत्साहाचं वातावरण (Marathi Dandiya 2022) आहे. या भाजपच्या दांडियावर टीका करताना सामनामधून कमलाबाईने खास मराठी दांडियाचे आयोजन करून मराठी मतदारांना आपलेसे करायचा प्रयत्न चालवला आहे, असं सांगत भाजप आपल्या राजकीय टिपऱ्या घुमवत आहे. तसेच मराठी एकजूट फोडता येईल हा त्यांचा भ्रम असल्याचं सांगत शिवसेनेकडून भाजपवर टीका करण्यात आली होती. परंतु सध्याचे चित्र पाहता मुंबईत तरी भाजपला मोठ्या प्रमाणामध्ये दांडिया प्रेमींचा प्रतिसाद भेटताना दिसून येत (BJPs Dandiya) आहे.

मराठी दांडिया मराठी कार्ड - येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी आपले डावपेच आखायला सुरुवात केले. अशात मुंबईत निर्बंध मुक्त वातावरणात व निःशुल्क होत असलेला दांडिया हा भाजपसाठी वरदानच ठरणार आहे. कारण मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांमध्ये भाजपने २०१७ च्या निवडणुकीत स्वतंत्रपणे निवडणूक लढवीत ८२ जागांवर विजय प्राप्त केला होता. तर त्यापेक्षा फक्त २ जास्त जागा जिंकत शिवसेनेने ८४ जागांवर विजय संपादन करत मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेच्या महापौर विराजमान झाला होता. परंतु सध्या मुंबई महानगरपालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी टोकाचे व शर्तीचे प्रयत्न करत असलेल्या भाजपाने विशेष करून मुंबईतील कमीत कमी १०० जागांवर जिथे मराठी मतं निर्णायक असतील, अशा ठिकाणी आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामध्ये मुंबईतील दादर, परल, लालबाग, माझगाव, शिवडी, भायखळा, तसेच गिरगाव हा महत्त्वाचा भाग आहे. मराठी दांडियाच्या निमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा मराठी कार्ड वापरण्याचा प्रयत्न केला असून कदाचित ही खेळी त्यांच्यासाठी निर्णायक ठरू (BJPs Marathi Dandiya worries Shiv Sena) शकते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.