ETV Bharat / city

Maharashtra Political Crisis: महाविकास आघाडी सरकारवर टांगती तलवार तरीही भाजपची सावध भूमिका! - Maharashtra Political Crisis

शिवसेनेतील बंडखोर आमदारांमुळे ( shiv sena rebel MLA ) महाविकास आघाडी सरकारवर अल्पमताची टांगती तलवार ( Mahavikas aghadi government in trouble ) आली आहे. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीने बहुमत सिद्ध केल्यास भाजपची गोची होऊ नये, यासाठी आसन व्यवस्थेत सध्या तरी कोणताही बदल करू नका, अशी मागणी भाजपकडून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली आहे.

sudhir mungantiwar
सुधीर मुनगंटीवार
author img

By

Published : Jun 29, 2022, 5:26 PM IST

मुंबई - शिवसेनेतील बंडखोर आमदारांमुळे ( shiv sena rebel MLA ) महाविकास आघाडी सरकारवर अल्पमताची टांगती तलवार ( Mahavikas aghadi government in trouble ) आली आहे. तरी भाजप सावध भूमिका घेत असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीने बहुमत सिद्ध केल्यास गोची होऊ नये, यासाठी आसन व्यवस्थेत सध्या तरी कोणताही बदल करू नका, अशी मागणी भाजपकडून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मंगळवारी रात्री भाजप नेत्यांनी भेट घेतल्याने राजकीय घडामोडींनी वेग आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( chief minister uddhav thackeray ) यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. त्यासंबंधीचे पत्र राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनाही पत्र पाठवले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची शक्यता ( government likely to run in Supreme Court ) आहे. सरकारला 30 जून रोजी बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.

शिवसेनेतील बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकारला उद्या बहुमत चाचणी द्यावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी होणाऱ्या अधिवेनादरम्यान, सुरक्षा व्यवस्थेच्या संदर्भात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची प्रधान सचिवांची भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज भेट घेतली. विधानसभेतील आसन व्यवस्थेत कोणताही बदल करू नका, अशी मागणी उपाध्यक्षांकडे केल्याचे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार ( sudhir mungantiwar ) यांनी सांगितले. तसेच पुरेशी व्यवस्था ठेवण्याची विनंतीही केल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्रात कोणाचीही गुंडगिरी चालणार नाही. जे लोक हरले आहेत ते आरोप करत असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. भाजपला एकच गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे की, हा महाराष्ट्र आहे. याठिकाणी आंतकी, गुंड प्रवृत्ती चालणार नाही. जशी प्रश्नपत्रिका असेल तशी उत्तर पत्रिका देऊ असेही ते म्हणाले. तसेच जे लोक धमक्या, गुंडगिरीची भाषा करत आहेत, त्याबाबत गंभीरतेने लक्ष द्यावे, सर्वांना लोकशाहीचा अधिकार बजावता यावा असेही मुनगंटीवार म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या टीकेला मुनगंटीवार यांनी आज प्रत्युत्तर देताना, तुमचे आमदार तुम्हाला टिकवता आले नाहीत, तुम्ही राज्यपालांवर टीका का करता? असा सवालही मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. राज्यपाल भाजपच्या इशाऱ्यावर काम करतात ही नाना पटोले यांच्या सुपिक डोक्यातून नापिक कल्पना आली आहे. त्यांच्या या कल्पनेला जनता भीक घालत नसल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

हेही वाचा - SC On MVA Petition : महाविकास आघाडीचे पुढील भवितव्य सर्वोच्च न्यायालयात आज 5 वाजता होणार स्पष्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.