ETV Bharat / city

Chandrakant Patil : राज्यात झालेल्या दंगलीचा निषेध म्हणून भाजपाचे २२ नोव्हेंबरला राज्यभर आंदोलन - चंद्रकांत पाटील - जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भाजपाचे आंदोलन

नांदेड, मालेगाव, अमरावतीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणातमध्ये जमाव रस्त्यावर येतो. याची कुठलीच कल्पना राज्य सरकारला नाही. गुप्तचर विभागाला नाही, असे कसे होऊ शकते. म्हणून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांच्यामार्फत केली जावी, अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Nov 19, 2021, 1:00 AM IST

मुंबई - त्रिपुरामध्ये झालेल्या घटनेचे (Tripura violence) पडसाद महाराष्ट्रात नांदेड, मालेगाव, अमरावतीमध्ये (Amravati violence) उमटले. त्रिपुरामध्ये जी घटना झालीच नाही, त्या घटनेचे पडसाद येथे उमटले आणि जातीय दंगली भडकल्या गेल्या. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीशांकडून व्हायला पाहिजे, ही मागणी करत येत्या सोमवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी दिला आहे.

'हे एक षड्यंत्र आहे'

त्रिपुरातील कथित हल्ला हा झालाच नव्हता. जुन्या कुठल्यातरी मशिदीची तोडफोड करण्यात आली होती. ते फोटो व्हायरल करून त्रिपुरामध्ये मस्जिद पाडली, असे पसरविण्यात आले व त्याचे पडसाद महाराष्ट्रात नांदेड, मालेगाव, अमरावती येथे उमटले. त्यासंदर्भात मोर्चे निघाले. जातीय दंगली भडकवल्या गेल्या. हिंदुची दुकान पेटवली गेली म्हणून हे एक षडयंत्र आहे. या षडयंत्रामागे मागे कोण आहे, याचा तपास करण्याची आवश्यकता असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

'सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायधिशांकडून चौकशी'

नांदेड, मालेगाव, अमरावतीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणातमध्ये जमाव रस्त्यावर येतो. याची कुठलीच कल्पना राज्य सरकारला नाही. गुप्तचर विभागाला नाही, असे कसे होऊ शकते. म्हणून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांच्यामार्फत केली जावी, अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. येत्या सोमवारी २२ नोव्हेंबरला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करून या घटनेचा निषेध करून नंतर जिल्हाधिकारी यांना याबाबत निवेदन देण्यात येणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. गुरुनानक जयंती आहे. नंतर शनिवार व रविवारी असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय सलग ३ दिवस बंद आहेत. त्यासाठी भाजपाचे हे भव्य आंदोलन आता येत्या सोमवारी राज्यभर होणार आहे.

हेही वाचा - Bhima Koregaon violence case ज्येष्ठ तेलुगु कवी वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.