ETV Bharat / city

...तर महापालिकेच्या विरोधात सदोष वृक्षवधाची याचिका दाखल करू - शिंदे - BJP group leader Prabhakar Shinde latest news mumbai

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबई शहरात २ हजार ३६४ वृक्ष उन्मळून पडल्याच्या तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्या आहेत. जर वेळीच वृक्ष छाटणी झाली असती, तर इतक्या मोठ्या प्रमाणात झाडांची हाणी झाली नसती. येत्या आठवडाभरात वृक्ष छाटणीच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात न झाल्यास, पालिकेवर सदोष वृक्षवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी याचिका दाखल करणार असल्याचा इशारा भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिला आहे.

प्रभाकर शिंदे
प्रभाकर शिंदे
author img

By

Published : May 19, 2021, 9:05 PM IST

मुंबई - तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबई शहरात २ हजार ३६४ वृक्ष उन्मळून पडल्याच्या तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्या आहेत. वादळानंतर ४८ तास उलटूनही रस्त्यावर पडलेल्या वृक्षांच्या फांद्या हटविण्यात आलेल्या नाहीत. याबाबत उद्यान विभागाकडे विचारणा केली असता हे काम करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती झाली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून वृक्ष छाटणीकरिता कंत्राटदाराच्या नियुक्तीचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीसमोर प्रलंबित असून, याला जबाबदार कोण? असा सवाल भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केला आहे. तसेच येत्या आठवडाभरात जर प्रत्यक्ष वृक्ष छाटणीस प्रारंभ केला नाही, तर मुंबई महापालिकेवर सदोष वृक्षवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपाच्या वतीने उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

...तर झाडे कोसळली नसती

तौक्ते चक्रीवादळाला सामोरे जाण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज असल्याचा केवळ देखावा करण्यात आला. तौक्ते चक्रीवादळादरम्यान पालिका प्रशासनाच्या मनुष्यबळाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. वादळानंतर ४८ तासांचा कालावधी लोटूनही रस्त्यावर पडलेल्या मोठ्या वृक्षांच्या फांद्या बाजूला करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे वाहतुकीला अडचण होत आहे. नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाताना उद्यान विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ, मोठी झाडे कापण्यासाठी साधनसामुग्री, विद्युत करवती उपलब्धच नाहीत. रस्त्यावरील पालापाचोळा उचलण्यासाठी यंत्रणाच तोकडी पडल्याचे चित्र आहे. वृक्ष प्राधिकरणाने वेळीच वृक्ष छाटणीसाठी कंत्राटदार नियुक्त केला असता, तर मार्च-एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष छाटणी झाली असती. त्यामुळे भार हलका झाल्याने कितीतरी झाडे कोसळली नसती. वृक्ष प्राधिकरण समितीच्या या अक्षम्य विलंबामुळे मुंबई शहर हजारो मोठ्या आणि प्राचीन वृक्षांना मुकले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात वित्तहानी गाड्यांची नासधूस झाली आहे. पालिकेच्या या बेजबाबदार वर्तनाचा तीव्र निषेध करत आहोत असं देखील शिंदे यांनी म्हटले आहे.

दोन हजारांहून अधिक झाडे कोसळली

मुंबईत तौक्ते चक्रीवादळादरम्यान सांताक्रुझ येथे २३०.०३ मिलीमीटर तर कुलाबा येथे २०७.६ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. तर वादळादरम्यान ११४ किलोमीटर वेगाने वारे वाहिल्याची नोंद झाली आहे. वादळासह पावसाने रुद्रावतार धारण केल्याने मुंबईला त्याचा फटका बसला. जागतिक वारसा असलेल्या गेट वे ऑफ इंडियाच्या बाजूला असलेली सुरक्षा भिंत कोसळली. अनेक वाहने, घरांवर झाडे पडल्याने मालमत्तेचे नुकसान झाले. चक्रीवादळामुळे मुंबईत सोमवारी सकाळपासून ते मंगळवारी सकाळपर्यंत २४ तासांत एकूण २३६४ झाडे व त्यांच्या फांद्या कोसळल्या. यात शहरात ६६६, पूर्व उपनगरांत ५९५ तर पश्चिम उपनगरांत ११०३ असे एकूण २३६४ झाडे पडल्याची नोंद झाली. यात वरळी बीडीडी चाळ येथे वडाचे झाड अंगावर पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला.

हेही वाचा - मोदींची महाराष्ट्राला सापत्न वागणूक, गुजरातला दिले 1 हजार कोटी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.