मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दक्षिण मुंबईतील सिल्वर ओक या निवास्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी मोठे आंदोलन छेडलं. दगड व चपला त्यांच्या निवासस्थावर फेकण्यात आल्या. याविषयी हे भाजपाचे आणि देवेंद्र फडणवीस यांच राजकारण असल्याचे बोलले जात आहे. याविषयी बोलताना भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महविकास आघाडीतील नेत्यांवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाल्या चित्रा वाघ? या विषयावर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की अशा पद्धतीने कुठल्याही नेत्याच्या घरी आंदोलन करणे चुकीचे आहे. पण एसटी कर्मचारी मागील ५ महिन्यापासून त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत. पण हे सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. निवडणुकी दरम्यान आघाडी सरकारने जाहीरनाम्यात ज्या एसटी विलीनीकरण बद्दल उल्लेख केला होता तेच हे मागत आहेत. आतापर्यंत १५० एसटी कर्मचाऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. तरी सरकार यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे.
भाजप व देवेंद्र यांचे नाव का? चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की अशा पद्धतीची आंदोलने झाले की त्यामागे भाजप किंवा देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा आरोप नेहमी केला जातो. पण आमचा या आंदोलनाशी काही संबंध नाही.भाजप किंवा देवेंद्र फडणवीस यांच नाव घेतल्याशिवाय आघाडी सरकारचे राजकारण पूर्णच होत नाही असा टोलाही त्यांनी या प्रसंगी लगावला.