ETV Bharat / city

खडसेंना राष्ट्रवादीत सन्मानाने प्रवेश दिल्याने चिडून भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करतंय - जयंत पाटील - जयंत पाटील बातमी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीसाठी बोलावल्यानंतर जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली.

jayant patil
जयंत पाटील
author img

By

Published : Jul 8, 2021, 3:20 PM IST

Updated : Jul 8, 2021, 5:04 PM IST

मुंबई - भाजप केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून एकनाथ खडसे यांच्याविरोधात कुभांड रचत आहे. मात्र, खडसे निर्दोष आहेत. या सर्व प्रकरणातून ते बाहेर येतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया देताना जयंत पाटील

हेही वाचा - डॉक्टर नव्हे सैतान... इस्लामपूरमध्ये मृतदेहावर केले तब्बल २ दिवस उपचार

  • खडसेंना राष्ट्रवादीत सन्मानाने घेतल्याने भाजप चिडले -

एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत सन्मानाने प्रवेश दिल्याने चिडून जाऊन भाजप केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करत चुकीच्या पद्धतीने अडकवत आहेत. मात्र, एकनाथ खडसे हे निर्दोष आहेत. त्यांनी चुकीचं काही केलेलं नाही. त्यामुळे या प्रकरणातून ते बाहेर येतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीसाठी बोलावल्यानंतर जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली. एकनाथ खडसे यांच्याविरोधात भाजपकडून कुभांड रचले जात असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

  • एकनाथ खडसेंच्या प्रकरणात तथ्य नाही -

एकनाथ खडसे यांच्यावर ज्या विषयावर कारवाई सुरू आहे त्यात तथ्य अद्याप आढळलेले नाही. तसेच कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत. एक जागा त्यांनी रितसर घेतली त्याबाबत निर्णय झालेला आहे. चौकशी समितीलाही त्यात काही चूक आढळली नाही. पण त्यामध्ये कुभांड रचून या सर्व तपास यंत्रणेमार्फत राजकीयदृष्टया अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

भाजपचा एकनाथ खडसे या ओबीसी नेत्यावर फार जुना राग आहे. एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये फार वाढू दिले नाही. ओबीसी नेतृत्वाला बाजुला करण्यात आले, असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी भाजपवर केला आहे.

हेही वाचा - दारुसाठी आईचा खून, मृतदेहाचे तुकडे करुन काढले काळीज, नराधम मुलाला फाशीची शिक्षा

Last Updated : Jul 8, 2021, 5:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.