ETV Bharat / city

भाजप सरकारकडून लातुरला रेल्वेने पाणी.. बिलाचा महाविकास आघाडीकडून भरणा!

सध्या कोरोनाचा काळ आहे. त्यामुळे या प्रकल्पाला थोडा उशीर होत आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू केले जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

Assembly news
विधानसभा बातमी
author img

By

Published : Mar 8, 2021, 12:16 PM IST

मुंबई- राज्यातील तत्कालीन भाजप सरकारने लातुरपर्यंत रेल्वेने पिण्याचे पाणी पोहोचवून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, रेल्वे आणि टँकरने पोहोचवलेल्या पाण्याचे बिल महाविकास आघाडीने भरल्याचा टोला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत भाजपला लगावला.

मराठवाड्यात 2016 मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. यावेळी नागरिक तसेच जनावरांनादेखील पिण्याचे पाणी मिळत नव्हते. अशी परिस्थिती असताना यावेळी राज्यातील तत्कालीन भाजप सरकारने लातूरपर्यंत रेल्वेने पिण्याचे पाणी पोहोचवून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, रेल्वे आणि टँकरने पोहचवलेल्या पाण्याचे बिल महाविकास आघाडीने भरले असल्याचा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. माजी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी विचारलेल्या उपप्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हा टोला लगावला.

हेही वाचा-महाराष्ट्र अर्थसंकल्प : राज्याच्या अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्राचा आधार - श्रीनिवास खांदेवाले

मराठवाड्यात दुष्काळ कायमस्वरूपी सोडवण्यासाठी भाजप सरकारने 'वॉटर ग्रीड' प्रकल्प सुरू केला होता. मात्र, हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारने गुंडाळण्याचा प्रयत्न केल्याचा भाजपकडून आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा-आत्मविश्वासाने आव्हानांचा सामना करा - यशोमती ठाकूर

वॉटर ग्रीड प्रकल्प बंद सुरुच राहणार-

उत्तर देताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, वॉटर ग्रीड प्रकल्प बंद करण्याचे पाप महाविकास आघाडी सरकार करणार नाही. मराठवाडा नेहमीच दुष्काळाच्या विळख्यात अडकलेला असतो. त्यामुळे मराठवाड्याला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प भाजप सरकारने सुरू केला आहे. त्याचे महत्त्व ओळखून हा प्रकल्प कदापि बंद केला जाणार नाही. या प्रकल्पामुळे मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. सध्या कोरोनाचा काळ आहे. त्यामुळे या प्रकल्पाला थोडा उशीर होत आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू केले जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. तसेच मराठवाड्यात असलेल्या धरणाची बाकी राहिलेली कामेदेखील लवकरच सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.

हेही वाचा-शेणाचा 'यज्ञ' केल्यास १२ तास घर निर्जंतुक राहते; मध्य प्रदेशच्या मंत्र्यांचा जावईशोध!

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.