ETV Bharat / city

आमदार निलंबनविरोधात कांदिवली पूर्वमध्ये भाजपचे निदर्शन; कार्यकर्त्यांना अटक

विधीमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन झाले. याविरुद्ध भाजप कार्यकर्त्यांनी कांदिवली पूर्वमध्ये रस्त्यावर उतरून संतप्त निदर्शने केली. कांदिवली पूर्व पोलिसांनी बळाचा वापर करून भाजप कार्यकर्त्यांना अटक केली.

author img

By

Published : Jul 6, 2021, 10:47 PM IST

Kandivali East BJP protests
भाजप कार्यकर्ता अटक

मुंबई - विधीमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन झाले. याविरुद्ध भाजप कार्यकर्त्यांनी कांदिवली पूर्वमध्ये रस्त्यावर उतरून संतप्त निदर्शने केली. कांदिवली पूर्व पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अटक केली.

प्रतिक्रिया देताना भाजप नगरसेवक कमलेश यादव

हेही वाचा - मुंबई कोरोना अपडेट : दुसऱ्या लाटेतील सर्वात कमी रुग्णांची नोंद, 453 नवे रुग्ण

विधानसभा अध्यक्षांच्या चेंबरमध्ये शिवीगाळ केल्याचा आरोप करत तालिका अध्यक्षांनी भाजपचे आमदार पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया या १२ आमदारांना निलंबित केले. या पार्श्वभूमीवर कांदिवली पूर्व विधानसभेत भाजपचे कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन आज सकाळीच रस्त्यावर उतरले. वसुली सरकारचा निषेध असो, ठाकरे सरकार हाय, अशा घोषणा देऊन त्यांनी संतप्त निदर्शने केली. पोलिसांनी आंदोलकांना अटक केली.

काय आहे प्रकार?

इम्पेरिकल डेटावरून विधानसभा अध्यक्षांच्या केबिनमध्ये भाजप आमदार गेले असता, यावेळी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव आणि भाजप आमदार संजय कुटे यांच्यात धक्काबुक्की झाली. याप्रकरणी 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले असून या बाबातचा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला. निलंबित आमदारांमध्ये पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया यांचा समावेश आहे.

हेही वाचा - Assembly Monsoon Session : दोन दिवसांचे अधिवेशन गोंधळात संपले; हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.