ETV Bharat / city

वाढीव वीजबिलांचा मुद्दा पेटला... भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर - वीजबिल होळी आंदोलन

महावितरण कंपनीने पाठवलेल्या वाढीव वीजबिलांविरोधात मागील आठवड्यापासून वातावरण तापत आहे. अनेक सर्वसामान्य ग्राहक तसेच शेतकऱ्यांना अवाजवी रक्कमेचे लाइटबिल पाठवल्याने त्यामध्ये तडजोड करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मुंबई, सांगलीत याविरोधात भाजपाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

excessive light bills in maharashtra
सोमवारी राज्यभरात वीजबिलांचा मुद्दा पेटणार... भाजपा, मनसेचा अल्टिमेटम
author img

By

Published : Nov 20, 2020, 12:41 PM IST

Updated : Nov 20, 2020, 1:41 PM IST

मुंबई - महावितरण कंपनीने पाठवलेल्या वाढीव वीजबिलांविरोधात मागील आठवड्यापासून वातावरण तापत आहे. अनेक सर्वसामान्य ग्राहक तसेच शेतकऱ्यांना अवाजवी रक्कमेचे लाइटबिल पाठवल्याने त्यामध्ये तडजोड करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या मुद्द्यावर राजकीय पक्षांनी हस्तक्षेप केल्यानं 'लाइटबिल' राजकारणाला सुरुवात झाली आहे.

महाविकास आघाडी सरकारने याबाबत कोणताही निर्णय जाहीर न केल्याने विरोधांच्या हातात आयतं कोलीत मिळालंय. त्यातच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही सरकारचा निर्णय पुढे रेटल्याने सर्वसामान्यांमध्ये असंतोष आहे. यामुद्द्यावरून विरोधीपक्षाने सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे. वाढीव वीज बिलांचा मुद्दा मार्गी न लावल्यास सोमवारपासून राज्यभरात आंदोलनाचा इशारा भाजपाने दिला आहे.

मुंबईत भाजपा महिला आघाडी रस्त्यावर उतरली असून मोठा मोर्चा काढण्यात आला आहे.

मुंबईत महिला मोर्चा आक्रमक

मुंबई आणि सांगलीत याविरोधात भाजपाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईत भाजपा महिला आघाडी रस्त्यावर उतरली असून मोठा मोर्चा काढण्यात आला आहे. भाजपाची महिला आघाडी महावितरणच्या कार्यालयावर धडकणार आहे. प्रकाशगड या महावितरणच्या मुख्य कार्यालयावर हा मोर्चा निघाला आहे. प्रकाशगडावर मोठ्या प्रमाणात भाजपाचे कार्यकर्ते जमा झाले आहेत. याठिकाणी शहराध्यक्ष मंगलप्रभात लोढा तसेच भाजपाचे प्रवक्ते आणि आमदार अतुल भातखळकर देखील उपस्थित आहेत. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दाखल झाले आहेत.

मुंबई, सांगलीत भाजपाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

मनसेचा अल्टिमेटम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सरकारला अल्टिमेटम दिला आहे. दोन दिवसांत वाढीव वीजबिलांचं प्रकरण मार्गी न लावल्यास मनसे स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी शेतकऱ्यांसह सर्वसमामान्यांचे वाढीव वीजबिल माफ करण्याची मागणी करण्यात आली.

सोमवारी होळी आंदोलन

वाढीव वीजबिलांवरून एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माणसेनेने ठाकरे सरकारला समोरवारपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तर भाजपाचे नेते देखील आक्रमक होत वीजबिल माफ करण्याची मागणी करत आहेत. वीजबिलातील सवलतीसाठी सोमवारी राज्यभरात भाजपातर्फे वीजबिल होळी आंदोलन करण्यात येणार आहे. त्यमुळे वीजबिलावरून विरोधक राज्यसरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे.

ऊर्जामंत्री म्हणाले, वीजबिलात सवलत मिळणार नाही

सर्वसामान्यांना आता वीजबिलाचा झटका सोसावाच लागणार आहे. राज्यातील वीजग्राहकांना मिटर रिडींगप्रमाणे जे बिल आले आहे, ते बिल त्यांना भरावे लागेल. त्यात कुठलीही सवलत मिळणार नाही, असे स्पष्टीकरण ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहे. लॉकडाऊनकाळात वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणात वाढीव वीजबिलं आली. सरकारकडून वीजबिलांमध्ये सवलत मिळेल अशी आशा होती, मात्र आता ऊर्जामंत्र्यांनी सवलत मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

रीडिंगप्रमाणे आलेले बिल भरावेच लागेल

ज्या ग्राहकांना मीटर रीडिंगप्रमाणे वीज बिले आलेली आहेत, त्यांना ती भरावी लागणार आहेत. तर ज्यांची अधिकची बिले आली होती, त्यासाठी आम्ही समिती स्थापन केली होती आणि त्या समितीकडून सुचवण्यात आलेल्या उपायांवर कारवाई सुरू आहे. ज्यांना अधिकचे बिल भरण्यासाठी अडचणी येतात, त्यांच्यासाठी आम्ही अनेक प्रकारच्या सवलतीही दिल्या आहेत, त्यासाठी आम्ही आदेशही दिले असून त्यात सविस्तरपणे आम्ही ग्राहकांना सवलती दिल्या आहेत. यामुळे आता सवलती देता येणार नाहीत, असेही राऊत यांनी सांगितले आहे.

Last Updated : Nov 20, 2020, 1:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.